एटापल्ली तालुक्यात भाजपाची भव्य बाईक रॅली मोदी @९ च्या पर्वावर महाजनसंपर्क अभियान

59
एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरली.

एटापल्ली तालुक्यात भाजपाची भव्य बाईक रॅली मोदी @९ च्या पर्वावर महाजनसंपर्क अभियान

एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरली.

भाजपा तालुका युवा मोर्चा चे अध्यक्ष संपत पैडाकुलवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली चे आयोजन

 

🖋️ मारुती कांबळे

गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

📱 9619614404

एटापल्ली :  केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपाला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने भाजपने मोदी @९ अंतर्गत महाजनसंपर्क अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. त्या निमित्याने भाजपा तालुका एटापल्ली तर्फे मोदी @९ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या भव्य बाईक रॅली चे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संपतजी पैडाकुलवार यांनी केले. ही भव्य बाईक रॅली एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात फिरवण्यात आली. भाजपाच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात लोकांना मिळालेले लाभ व भाजपने केलेले कार्य संपूर्ण जनसंपर्क रॅली मध्ये माहिती देत रॅली काढण्यात आली. व या रॅली मध्ये हर हर मोदी,घर घर मोदी,राजे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है,भारत माता की जय म्हणत संपूर्ण वातावरण दुमदुमला गेला. या भव्य रॅली ची सांगता राजीव गांधी शाळेचा परिसरात करण्यात आली. या भव्य रॅली चे नेतृत्व भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष संपतजी पैडाकुलवार यांनी केले. या भव्य बाईक रॅली मध्ये  उपस्थित बाबुरावजी गंपावार,अशोकजी पुल्लुरवार,प्रशांत आत्राम उपसरपंच तोडसा,उशंनाजी मेडीवार,मोहनजी नामेवार,बाबला मुजुमदार,अशोक चकण्यारपवार,प्रशांत गजाडीवार, सम्मा जेट्टी,डी.सी.दुर्वा,राजु गावतुरे,जीतु खन्ना,क्रिष्णा नामेवार,दमण मेडीवार,साईकिरण नामेवार,रोशन सोनी,रमेश नरोटी,मनीष ढाली,अनिकेत मामीडवार,अल्ताप शेख,साईराम पित्त्तुलवार,नितेश कोल्हे,सुरज मंडल,किशोर डे,सुखदेव बिश्वास,तिरुपती समुद्गलवार व बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.