एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरली.

एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरली.

एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरली.

एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरली.

✍️मृणाली जाधव ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70834 51685📞

इंदापूर : – एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक वेशभूषेत टाळ, मृदुंगाचा गजर करीत पालखी खांद्यावर घेऊन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व प्राथमिक विभाग ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली. तसेच शाळेच्या मैदानात ज्ञानोबा – माऊली- तुकारामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.कुमार शार्दुल शैलेश शिंदे व कुमारी कल्याणी सुदर्शन महाजन यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारली होती तसेच काही विद्यार्थ्यांनी संतांची भूमिका साकारली होती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजीता जाधव मॅडम यांच्या शुभहस्ते विठ्ठलाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.संचिता जाधव मॅडम तसेच शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.