गणेश मूर्तीच्या रंगकामाची लगबग
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- गणरायाचे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरोघरी आगमन होणार आहे. त्यामुळे अवघे 55 दिवस शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यातील गावागावात कच्च्या गणेशमुर्तींना पॉलीश करण्यापासून रंगकाम करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यातून अनेक गावांतील नागरिकांना रोजगाराचे दालन खुले झाले आहे.
पेणमधील गणेशमुर्ती आकर्षक व रेखीव असतात. त्यामुळे गणेशमुर्ती तयार करण्याचे माहेर घर म्हणून पेण तालुक्याकडे पाहिले जाते. पेणमधील गणेशमुर्तीला रायगड जिल्ह्यासह वेगवेगळ्या राज्यात, देश, विदेशात मागणी असते. स्थानिकांकडूनही पेणच्या मुर्तीला पसंती दर्शविली जाते.तसेच अलिबाग तालुक्यातील अनेक गावात गणेश कार्यशाळा आहेत.त्या मध्ये हजारो गणेश मूर्ती बनविल्या जातात.येथील अनेक गणेशमूर्ती पर देशात ही पाठविल्या जातात.
अलिबाग तालुक्यातील अनेक गावात गणेशमुर्ती तयार करण्यापासून त्या रंगविणे, पॉलीश करणे अशी अनेक कामे करण्याचे काम सुरू झाले आहे. ग्राहकाच्या मागणी प्रमाणे शाडूच्या मुर्ती तसेच प्लास्टर च्या मूर्ती आणून गावागावात त्यांना रंगकाम करण्याचे काम सूरू करण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात मुर्तींना रंगविण्याचे काम वेगाने सूरू झाले आहे.
दरम्यान, मुर्तींना पॉलीश करणे, रंगविणे अशा अनेक प्रकारची कामे करण्यासाठी स्थानिकांना रोजगार प्राप्त होऊ लागला आहे. विशेष म्हणजे महिला वर्गदेखील ही कामे आवडीने करीत असल्याचे चित्र आहे. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील
श्री गणेश आर्ट्स , वाघ्रण, बोडणी , अलिबाग येथे गणेशमुर्ती रंगविण्याचे काम सुरू झाले आहे. वेगवेगळ्या भागातून या मुर्तींना मागणी वाढली असून बुकींग सूरू असल्याचे मुर्तीकार- राजेंद्र अनंत म्हात्रे , प्रितम राजेंद्र म्हात्रे यांनी सागितले.
प्लास्टर ऑफ पॅरिस वापरायचे का नाही याबाबत शासन निर्णय होण्यास खूप वेळ झाला. त्यामुळे गणपतीची मूर्ती बुकिंग यावेळी उशिरा झाली. खारेपाट विभागांमध्ये गणेश भक्ताच्या आवडीप्रमाणे गणेश मूर्ती बनवून द्याव्या लागतात.त्यामुळे शक्यतो शाडूच्या मातीच्या मूर्ती जास्त बनविल्या जातात. गणेश भक्तांच्या आवडीनुसार मूर्ती बनवल्या जातात. यावेळी पौराणिक चित्रांची प्रचंड मागणी आहे
– – प्रथमेश राजेंद्र म्हात्रे(जी डी आर्ट)
मूर्तिकार वाघ्रण