मोकाट जनावरांच्या मालकांवर होणार कारवाई

मोकाट जनावरांच्या मालकांवर होणार कारवाई

मोकाट जनावरांच्या मालकांवर होणार कारवाई
मोकाट जनावरांच्या मालकांवर होणार कारवाई

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिगणघाट ०२/०८/२१
शहरातील मुख्य मार्गावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहन धारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. या बाबत अनेकांनी स्थानिक प्रशासनाकडे अनेकदा लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्या तुन काहीही साध्य झाले नाही .सकाळ झाली की जनावरांचे मालक जनावरांना चारा खाण्यासाठी सोडून देतात.ही मोकाट जनावरे दिवसभर बाजार परिसरात भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावर फेकलेला माल खाऊन रात्रीच्या वेळेस शहरातील मार्गावर आणि मुख्य बस स्टँड तसेच आबेडकर स्मारकाच्या समोर तसेच करजा चौक वोटोबा चौक अगदी रस्त्यावर येऊन बसतात आणि हे मार्ग जास्त वाहतुकीची असल्याने या मार्गावर रात्रंदिवस वाहतूक सुरू असते.

रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे ही मोकाट जनावरे वाहन चालकांना दिसून येत नाही अशा वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक असते.मोकाट जनावरांनी बसण्यासाठी आपली जागा निश्चित केल्याचे दिसून येत आहे तर मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचे कळप रस्त्यावर बसून असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता स्थानिक प्रशासनाने अशा मोकाट जनावरांना पकडून कोंडवड्यात जमा केले पाहिजे पण असे होताना दिसून येत नाही.आता मात्र अशी मोकाट जनावरे रस्त्यावर बसून दिसल्यास स्थानिक पातळीवरील प्रशासनाला मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करणे अनिवार्य आहे असे झाल्यास वाहन धारकांचा अपघात होण्याचे प्रमाण निश्चित तच कमी होणार आहे. त्या मुळे जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी किंवा कारवाई ला सामोरे जावे.