नासुप्रनी विकसीत केलेले गाळेमागासवर्गीय विदयार्थ्याच्या वसतिगृहासाठी उपयुक्त -पालकमंत्री Dr Nitin Raut* *खरेदीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवण्याचे निर्देश*

*नासुप्रनी विकसीत केलेले गाळेमागासवर्गीय विदयार्थ्याच्या वसतिगृहासाठी उपयुक्त -पालकमंत्री Dr Nitin Raut*

*खरेदीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवण्याचे निर्देश*

नासुप्रनी विकसीत केलेले गाळेमागासवर्गीय विदयार्थ्याच्या वसतिगृहासाठी उपयुक्त -पालकमंत्री Dr Nitin Raut* *खरेदीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवण्याचे निर्देश*
नासुप्रनी विकसीत केलेले गाळेमागासवर्गीय विदयार्थ्याच्या वसतिगृहासाठी उपयुक्त -पालकमंत्री Dr Nitin Raut*
*खरेदीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवण्याचे निर्देश*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

नागपूर : -वाठोडा येथील नागपूर सुधार प्रन्यासचे घरकुल योजनेतील गाळे मागासवर्गीय विदयार्थ्याच्या वसतीगृहासाठी खरेदी करण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांना दिले. गाळे खरेदीच्या प्रस्तावाला त्यांनी तत्वत: मंजुरी दिली.

वाठोडा येथील या गाळयांना त्यांनी आज भेट देऊन पाहणी केली.यावेळी अधिक्षक अभियंता लीना उपाध्ये व समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड उपस्थित होते.

जिल्हयात एकूण 25 वसतिगृह कार्यरत आहेत.त्यापैकी 16 भाडयाच्या इमारतीत आहेत. या 16 पैकी 7 मुलांचे तर 9 मुलींचे वसतीगृह आहेत. मुलांसाठी स्वाधार योजना व भाडेपोटी घेतलेल्या इमारतींचा खर्च 8.49 कोटी प्रति वर्ष असल्याची माहीती गायकवाड यांनी दिली.
तर मुलीसाठी हाच खर्च 7.51 कोटी प्रति वर्ष असा आहे.भविष्यात संभावित विदयार्थ्याची वाढणार संख्या पाहता भाडे खर्च वाढता असु शकतो.त्यामुळे मागासवर्गीय मुला मुलींच्या वसतीगृहासाठी नासुप्रनी विकसीत केलेले गाळे उपयुक्त असून शासनाचा वसतीगृह भाडयाकरीता होणारा खर्च वाचणार आहे.तसेच सामाजिक न्याय विभागाकडे दिर्घकाळाकरीता सुविधायुक्त वास्तु उपलब्ध होईल.
448 गाळयाच्या या सुसजज वास्तुत 2352 मुलांच्या राहण्याची व्यवस्था होऊ शकते अशी माहिती लीना उपाध्ये यांनी दिली.तसेच गृहपाल निवास कक्ष,ग्रंथालय, वाचनालय ,सुरक्षा रक्षक कक्षासाठी सुध्दा जागा उपलब्ध आहे .
सौर उर्जेचा ही वापर केला आहे. स्वतंत्र मलजल प्रक्रीया व विदयुत उपकेंद्र असलेली ही इमारत मागासवर्गीय विदर्थ्यासाठी उपयुक्त असल्याचे पालकमंत्री म्हणाले.लवकरात लवकर या इमारत खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची सूचना त्यांनी केली.