अशोकदादा साबळे विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

अशोकदादा साबळे विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

अशोकदादा साबळे विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞

माणगांव :-माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदादा साबळे विद्यालय व माणगाव ज्युनियर कॉलेज माणगाव येथे सोमवार दिनांक.1ऑगष्ट2022 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यावेळी त्यांच्या समवेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या वक्तृत्व स्पर्धेत श्रीनुज शेठ,सार्थक काळे,ऋषिकेश गवते कु.रिया गावडे,कु.सोनाली मुरूडकर,कु.बौधीक्षा गायकवाड,कु.चेतना दाभणे,कु.सानिया जाधव,कु.सलोनी खाडे इत्यादी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट भाषणे केली.
या स्पर्धेत उत्कृष्ट भाषणे करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्कूल कमिटी चेअरमन मा.राजन भाई मेथा ,श्री.निलेश शेठ ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.चेतन गवाणकर ,मुख्याध्यापक श्री.जाधव सर यांच्या वतीने करण्यात आला.
सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड मा.राजीवजी साबळे,स्कूल कमिटी चेअरमन मा.राजन भाई मेथा,सेक्रेटरी मा.कृष्णाभाई गांधी तसेच संस्थेचे पदाधिकारी ,विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य श्री.डी.एम.जाधव सर ,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी
यांच्या वतीने कौतुक करण्यात आले.
ज्युनियर कॉलेज चे प्रा.श्री.अधिकारी सर यांनी सुंदर फलक लेखन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाचे आयोजन श्री.साळवे सर,जमधाडे सर,ऊभारे सर,सौ.बिरादार मॅडम,सौ.ठाकरे मॅडम यांनी उत्तमरीत्या केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.उभारे सर यांनी केले व शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.भोसले सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.