आई चे दूध म्हणजे बाळा साठी अमृतच – डॉ अमरीश मोहबे
✍विजेंद्र मेश्राम✍
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
89750 19967
गोंदिया : – जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त जिल्हा आरोग्य प्रशासना तर्फे स्थानीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता
या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी केले या वेळी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिनेश सुतार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बी डी जयस्वाल नगर परिषदेच्या माजी सभापती सौ भावना ताई कदम बाई गंगाबाई महिला रुग्णालयात च्या प्रभारी डॉ सुवर्णा हुबेकर
एन आर सी चे वैद्यकीय आधिकारी डॉ अनिल परियाल डॉ अर्चना जाधव डॉ गायत्री धाबेकर मेट्रोन अर्चना वासनिक ओपिडी इंचार्जे नीलम अवस्थी स्वाती पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या
एन आर सी च्या आहार समुपदेशिका स्वाती चौहान यांनी जागतिक स्तनपान सप्ताह बाबत विस्तृत रूपरेखा विषद केली
बाई गंगाबाई येथे भरती झालेल्या माता पालकांना स्तनपान सप्ताह बाबत शपथ डॉ सुवर्णा हुबेकर यांच्या नेतृत्वात देण्यात आली
जागतिक स्तनपान सप्ताह चे उदघाटक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंमरीश मोहबे
यांनी माता पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की डिलिव्हरी झाल्या बरोबर पहिल्या 30 मिनिटांत नवजात शिशुला स्तनपान दिले पाहिजे करण सुरुवातीचे चीक दूध colostrum कोलोस्त्रम म्हणजे बाळाचे सर्वात पहिले लसीकरण आहे यात रोगप्रतिकार शक्ती वाले अँटिबॉडीज असतात त्यामुळे भविष्यात बाळाला नुमोनिया डायरिया किंवा गंभीर आजारा पासून प्रतिकार शक्ती मिळते आई चे दूध म्हणजे बाळासाठी अमृतच आहे त्यामुळे मातेला नवजात शिशुला स्तनपान देण्यासाठी प्रवृत्त करावे! या वेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिनेश सुतार यांनी आवाहन केले की सुदृढ बालक हीच देशाची खरी संपत्ती आहे त्यामुळे कुपोषण टाळायचे असेल तर नवजात शिशु ला पाहिले 6 महिने निव्वळ स्तनपान दिले पाहिजे
प्रमुख अतिथी सौ भावनताई कदम यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की आधुनिक युगातील महिलांनी नवजात शिशुला स्तनपान दिलेच पाहिजे बॉटलचे दूध पाजू नये स्तनपान केल्या मूळे नवजात शिशु सुदृढ होतोच पण स्तनदा मातेला पण खूप आरोग्यदायी लाभ होतात
एन आर सी च्या आहार समुपदेशिका स्वाती चौहान यांनी स्तनदा माते ने कसा संतुलित आहार घेतला पाहिजे या बद्दल माहिती दिली
कार्यक्रमाचे संचालन समुपदेशिका नितु फुले यांनी केले व आभार प्रदर्शन एन आर सी च्या इंचार्जे रुपाली टोने यांनी व्यक्त केले
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त बाई गंगा बाई महिला हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात भव्य आरोग्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती त्याचा लाभ उपस्थित माता पालक व रुग्ण आणि नातेवाईक यांनी घेतला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन आर सी च्या स्टाफ साहू , छाया चन्ने , पल्लवी वासनिक, सुवर्ण राऊत श्रीमती सारिका तोमर राहुलकर, रजनी पडोळे, आदींनी परिश्रम घेतले.