लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भिवंडी महानगरपालिकेतर्फे अभिवादन.

लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भिवंडी महानगरपालिकेतर्फे अभिवादन.

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे १८/०२/२०२५ चे परिपत्रक व भिवंडी महानगरपालिका मा. प्रशासक तथा आयुक्त श्री. अनमोल सागर (भा.प्र.से) यांच्या निर्देशानुसार दि.०१/०८/२०२५ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका मुख्यालयातील तळमजल्यावर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मा. सहा-आयुक्त (प्रशासन) श्री अजित महाडिक यांच्या शुभहस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर नारपोली येथिल आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मा.सहा आयुक्त प्रभाग समिती क्र. ०४ गिरीष घोष्टेकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यांमधील वाटेगांव येथे अत्यंत छोट्या गांवी लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट रोजी झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती चळवळींमध्ये त्यांनी त्यांच्या शाहिरीतून महत्वाचे योगदान दिलेले होते, अशा लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी मुख्यलयातील कार्यालयात मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेश पवार, परवाना, जाहिरात व मार्केट विभाग प्रमुख श्री.स्नेहल पुण्यार्थी, दुरध्वनी विभाग प्रमुख श्रीम. आश्विनी पांडव, बारनिशी विभाग प्रमुख श्रीम. दिपीका ठाकरे तर प्रभाग समिती क्र. ४ येथील कार्यक्रमास श्री गिरीष घोष्टेकर- प्रभाग अधिकारी, श्री फ़ैसल तातली आरोग्य विभाग प्रमुख, श्री हरीष भंडारी -मुख्य आरोग्य निरीक्षक, श्री अनिल आव्हाड कार्यालयीन अधिक्षक प्र. स.क्र.४, तसेच श्री. विकास निकम माजी नगरसेवक, श्री लक्ष्मण गायकवाड (सेवानिवृत्त) शहर अभियंता भिनिशमनपा व इतर कर्मचारी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.