बिग बाॅस विजेता अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचं निधन

55

बिग बाॅस विजेता अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचं वयाच्या चाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन, कूपर इस्पितळातून त्यांच्या निधनाच्या बातमीची पुष्टी

बिग बाॅस विजेता अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचं निधन

 

राज शिर्के

मुंबई,दि.२ सप्टेंबर २०२१: अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं गुरुवारी निधन झालं. कूपर इस्पितळातून त्याच्या निधनाच्या बातमीची पुष्टी देण्यात आली. ४० वर्षीय अभिनेत्याचा हृदयविकाराने निधन झाले.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचं वयाच्या ४० व्या वर्षी निधन झालं. प्राथमिक तपासणीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. पुढील तपासणी कूपर रुग्णालयाचे जेष्ठ डॉक्टर करत आहेत.

१२ डिसेंबर, १९८० रोजी सिध्दार्थ शुक्ला यांचा जन्म झाला होता. बालिका वधू, दिल से दिल तक अशा मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. सिध्दार्थ शुक्ला हा बिग बाॅसच्या १३, फिअर फॅक्टर चा विजेता होता.हम्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ब्रोकन बट ब्युटिफुल या वेब सीरीजमध्ये काम केलं होतं. त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. तसेच त्यांनी सावधान इंडिया आणि इंडिया गॉट टॅलेंट सारख्या रिऍलिटी टीव्ही कार्यक्रमांचं होस्टिंग केलं होत. विशेषतः तरुणाईंमध्ये प्रसिद्ध असलेल्या सिद्दार्थ शुक्ला यांच्या अकाली जाण्याने कलाकार आणि सामान्य जनतेकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.