अल्लिपुर येथे कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी ढगे सुरक्षित फवारणीबाबत कृषी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत शेतात फवारणी करतेवेळी विषबाधा होवु नये यासाठी कशी काळजी घ्यावी याबद्दल अल्लिपुर येथे कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी ढगे हिने शेतकऱ्यांना सुरक्षा किटचे महत्व तथा किटकनाशक कसे हाताळावे याबाबत मार्गदर्शन केले. फवारणी करतांना संरक्षण कपडे घालावेत,नाक व तोंडावर मास्क वापरावा, फवारणी करताना औषध येणार नाही याची काळजी घ्यावी औषध बॉटल खोलत असताना तोंडाने न उघडता अवजारांचा वापर करावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. हा कार्यक्रम मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए ठाकरे, उपप्राचार्य एम.व्ही.कडू, कार्यक्रम अधिकारी शुभम सरप, व एस वानखडे (विषयतज्ञ) यांचे मार्गदर्शन लाभले.