पिपरी येथे घराची भिंत कोसळून वंदना डोफे महिलेचा मृत्यू पिंपरी येथील घटना

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट तालुक्यातील पिंपरी येथे 31 ऑगस्ट रात्री च्या आठ वाजताच्या वेळेस दिवसभर मुसळधार पावसामुळे 2 दिवस हजेरी लावली , पिपरी येथे मंगळवारी सायंकाळी वंदना रमेश डोफे, मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करायच्या वय 48 असून यांच्या घराच्या भिंती पाणी मुरल्यामुळे मंगळवारी 31 ऑगस्टच्या रात्री आठ वाजता वंदना डोफे आपल्या मूला सोबत अमोल डोफे व आई जेवण करून बसले होते, अचानक त्या घरात पाणी आणण्यासाठी गेल्या असताना अचानक घराची भिंत त्यांच्यावर कोसळली व त्या वंदना रमेश डोफे महिलेच्या अंगावर भिंत कोसळली त्यात त्या जागीच दबून मृत पावल्या मुलाने अमोल डोफे आई कडे धाव आरडा ओरडा केला व लोकांनी व नागरिकांनी त्यांनी धाव घेतली व त्यांना बाहेर काढून वडनेर ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल केले ,मात्र तोपर्यंत त्यांचा जागीच प्राण गेला या घटनेमुळे पिपरी गावात सध्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, घटनास्थळी रात्री साडे नऊ वाजता हिंगणघाट चे तहसील अधिकारी साहेब व मंडळ अधिकारी तलाठी सरपंच। पोलीस पाटील यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीने भेट दिलीव शासनाने मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे, व कुटूंबा मध्ये 2 बहीनि असून माधुरी शेळके , शुबांगी आटे, यांचे विवाह झाले , 1 टाच मुलगा अमोल डोफे हा एकटाच असून त्याला शासनाने मदत करावी , पुढील तपास वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मागर्दशनात पुढील तपास करीत आहे,