नागपुर डेंग्यूच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पालीकेचा महापौरांना घेराव.

46

नागपुर डेंग्यूच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पालीकेचा महापौरांना घेराव.

नागपुर डेंग्यूच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पालीकेचा महापौरांना घेराव.
नागपुर डेंग्यूच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पालीकेचा महापौरांना घेराव.

✒युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- :- कोरोना वायरसची दुसरी लाट आता कुठे कमी झाली त्यात आता शहरात डेंग्यूने आपले हात पाय प्रसरायला सुरुवात केली आहे. रोज नवी डेंग्यूने बाधित रुग्ण समोर येत आहे. त्यामूळे सामान्य जनता भयाखाली आहे.

नागपूर शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी नागपुर महानगर पालिका मुख्यालय परिसरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फॉगिंग केले. गोवऱ्या जाळून धूर केला. तसेच महापौर दयाशंकर तिवारी यांना घेराव घातला.

नागपुर महानगर पालिका प्रशासन शहरातील कचऱ्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. महापौरांना शहरातील नागरिकांची चिंता नाही. महानगर पालिका झोन कार्यालयात फॉगिंग मशीन नाहीत. असा दावा आंदोलकांनी केला. यामुळे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. कोविड नंतर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप केला. महापौरांनी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

आंदोलनान शहर युवक काँंग्रेसचे उपाध्यक्ष वसीम खान, अक्षय हेटे, रौनक चौधरी, फजलुर्रहमान कुरैशी, संदीप देशपांडे, अक्षय डोर्लीकर, सुमित ढोलके, कुणाल समुंद्रे, शुभम तलहर, कुणाल फुले, अंकित बंसोड, फिरोज खान, सोनू कुबडे पंकज बालपांडे, ऋषभ जैश,नकील अहमद यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.