राळेगाव तालुक्यातील वडकी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

53

राळेगाव तालुक्यातील वडकी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

राळेगाव तालुक्यातील वडकी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी 9309747836

राळेगाव तालुक्यातील वडकी येथील गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि 2 सप्टेंबर रोजी वडकी येथे उघडकीस आली आहे. विशाल भाऊरावजी खोंडे वय वर्ष ३७ रा.वडकी असे या युवकाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवारला सकाळी 7 वाजताच्या दरम्यान मृतक विशालची आई ही घराबाहेर भांडे घासत होती व विशालची पत्नी ही माहेरी गेली असल्याने विशाल हा घरी एकटा असल्याने सकाळच्या सुमारास त्याने आपल्या घरी लावण्यात आलेल्या पाळण्याच्या दोरीला गळफाळ घेऊन आपली जीवनयात्रा संपविली,मृतक विशाल हा त्याचा आईला एकुलता एक मुलगा असल्याने घराचा उदरनिर्वाह हा त्यांचेवरच होता,आपल्या एकुलत्या एक मुलाने असे टोकाचे पाऊल उचल्याने विशालच्या आईवर मोठे दुःखाचे डोंगर कोसळल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचे पश्चात आई,पत्नी व लहान मुलगा असा आप्त परिवार आहे,या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे बिट जमादार रमेश मेश्राम सह किरण दासरवार यांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढील राळेगाव येथे पाठविण्यात आला.विशाल च्या अश्या एकाएकी जाण्याने मित्रपरिवारात शोककळा पसरली होती