शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात परवानगी देण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन

नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
9623754549
धुळे : -सविस्तर वृत्त– कोरोना काळात त्याच्या पार्श्वभूमी वर एप्रिल 2021 पासून प्रत्यक्ष अध्यापन पासून बंद आहेत त्यांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान या शैक्षणिक नुकसाना बरोबरच मानसिक व शारीरिक विकासावर देखील परिणाम होत आहे दिनांक 07 जुलै 2021 च्या आदेशानुसार शासनाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरक्षित पणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देऊन ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यानुसार धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा प्रत्यक्ष 15 जुलै 2021 पासून सुरू झाल्या आहेत तसेच दिनांक 10 ऑगस्ट 2021च्या आदेशानुसार शासनाने शहरी भागातील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देऊन शाळा दिनांक 17 ऑगस्ट पासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे परंतु धुळे जिल्ह्यातील शहरी भागातील प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी अद्याप जिल्हा स्तरावरून कोणताही आदेश शाळांना प्राप्त झालेला नाही त्यामुळे धुळे शहरातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत जिल्ह्यातील आणि धुळे शहरातील सध्या कोरोना महामारीची परिस्थिती सुधारले असून त्यामुळे शासन निर्णयातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर शाळा सुरू करणे शक्य आहे तरी धुळे शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी याबाबत माननीय जिल्हाधिकारी सो. जलज शर्मा यांना धुळे शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर श्री आर टी पाटील उपाध्यक्ष धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष , उदय तोरवणे सचिव धुळे शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, संजीव एच. पाटील अध्यक्ष तसेच श्री आर. एस रावते मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी हायस्कूल धुळे श्री मनीषा धात्रक मुख्याध्यापक अभय हायस्कूल धुळे ,श्रीमती मनीषा जोशी मुख्याध्यापक कमलाबाई कन्या शाळा धुळे विलास पाटील मुख्याध्यापक महानगरपालिका हायस्कूल धुळे एन एम जोशी मुख्याध्यापक के एस के न्यू सिटी हायस्कूल धुळे वाय बी पटेल मुख्याध्यापक मोहम्मद हायस्कूल धुळे तसेच महाले मुख्याध्यापक आदींनी सह्या केल्या आहेत