एटापली भगवंतराव महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिर संपन्न
मारोती काबंऴे
गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593
एटापल्ली :- भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे तहसील कार्यालय एटापल्लीच्या वतीने 1 सप्टेंबर २०२३ रोजी नविन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे होते, तर प्रमूख अतिथी म्हणून श्री.पी.व्ही. चौधरी(तहसीलदार एटापल्ली), प्रा.डाॅ. सुधीर भगत, प्रा.डाॅ.बाळकृष्ण कोंगरे, प्रा.निलेश दुर्गे(कार्यक्रम अधिकारी, आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभाग) प्रा.चिन्ना पुंगाटी, श्री.जगदीश सिडाम(अव्वल कारकून निवडणूक शाखा एटापल्ली), श्री.नंदकिशोर पंचभाई(ऑपरेटर निवडणूक शाखा एटापल्ली), श्री.पंकज उसेंडी(तलाठी एटापल्ली),श्री. राहुल मेश्राम(तलाठी गट्टा), श्री.सतिश पुंगाटी(कोतवाल एटापल्ली), प्रा.डाॅ.श्रुती गुब्बावार, प्रा.डाॅ.स्वाती तांतरपाळे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार श्री.पि.व्ही.चौधरी यांनी आपल्या भाषणात, “नवमतदारांनी येणाऱ्या निवडणूकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम शक्तीशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपले मतदानाच्या स्वरूपात सहकार्य करावे” असे आवाहन केले.
तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एस.एन. बुटे यांनी “मतदान करणे देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते.याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे नितांत गरजेचे आहे,” असे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयातील ४५ विद्यार्थ्यांकडून नमुना क्रं.6 नवीन मतदार नोंदणीचे फार्म भरुन घेण्यात आले. याकार्यक्रमाचे संचालन आदित्य राऊत व कु.अपर्णा गोलदार यांनी केले तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ. संदिप मैंद यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.