साकळीचे तलाठी व्ही.एच.वानखेडें यांच्यावर कठोर कारवाईसाठी लेखी तक्रार, गावातील राजकीय व्यक्तींना मदत करीत असल्याचा आरोप

✒️ सुपडू संदानशिव✒️

यावल तालुका प्रतिनिधी

📱9561200938📱

 तालुक्यातील साकळी येथील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामात साकळीचे तलाठी व्ही.एच.वानखेडे हे अक्षम्यपणे दुर्लक्ष करित असून गावातील एका राजकीय गटास उघडपणे मदत करीत आहे.असा आरोप वानखेडे त्यांच्यावर करण्यात आलेला असून त्यांच्यावर निवडणुकीच्या कामात कसूर केल्याप्रकरणी कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच त्यांच्या बेजबाबदारपणाच्या कर्तव्यातून निवडणुकीच्या दरम्यान कुठलाही वाद उत्पन्न होऊ नये म्हणून त्यानंतर त्यांच्यावर निवडणुकीबाबत कुठलीही कामकाज देऊ नये.त्यांना त्या कामातून बडतर्फ करण्यात यावे.अश्या कारवाईसाठी साकळी येथील मनोज (मनू) सुकलाल निळे यावल तहसिलदारांकडे लेखी तक्रार केलेली आहे.

         तक्रारी अर्जानुसार, साकळी ता.यावल येथील येत्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी करता निवडणूक यंत्रणेमार्फत निवडणुकी संबंधीचे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले.तसेच निवडणूक कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा व आव्हानात्मक कार्यक्रम असल्याने त्याबाबत सर्व प्रकारचे कामकाज करताना संबंधित प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी व काळजी घेणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणताही आक्षेप होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.मात्र सदर आमच्या गावाच्या निवडणुक पुर्वीच्या कार्यक्रमांमध्ये यावल निवडणूक विभाग तसेच साकळी महसूल प्रशासन व साकळी ग्रामपंचायत प्रशासन या सर्वांनी चांगलाच सावळा गोंधळ करून ठेवलेला असून मनमानी तसेच हमशाही पद्धतीने सर्व कारभार केलेला आहे.त्यापैकी वार्ड रचना करणे,वार्डनिहाय आरक्षण काढणे,मतदार यादीचे वाचन करणे,अंतिम यादी प्रसिद्ध करणे या कामांमध्ये खूप मोठ्या चुका करून ठेवलेल्या आहे.त्यावर ग्रामस्थांनी वेळोवेळी आक्षेप घेतलेला आहे मात्र नागरिकांच्या आक्षेपांकडे संबंधित प्रशासनाने साप दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. सर्वच वार्डांच्या अंतिम मतदार यादी मध्ये मोठा गोंधळ असून गावातील अनेक नागरिकांचे नावे मतदार यादीतून गायब झाल्याचे दिसून येत आहे.

      दरम्यान निवडणूक कामाची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आलेली आहे ते साकळीचे तलाठी व्ही.एच.वानखेडे यांनी तर निवडणुकीच्या कामात मोठा कहर केलेला असून या कामांमध्ये त्यांनी कुठेली गंभीर्याने घेतलेले दिसून आले नाही.उलट आपल्या बेजबाबदार,मनमानी वागण्यातून तसेच नागरिकांना दिलेल्या आपल्या उर्मट भाषेतून अनेकांना दुखावले आहे.ते कोणाशीही नम्रतेने अथवा व्यवस्थित बोलत नाही ते फक्त त्यांच्या उग्रमी व संतप्त भावनेने बोलतात त्यांच्याजवळ निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या कामाचा कुठलाही अनुभव नाही त्यामुळे त्यांनी साकळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे हे काम नुसते 

वेळकाढू व चालढकलपणे केलेले आहे.त्याचप्रमाणे गावातील एका राजकीय व्यक्तीशी जवळीक करून व त्याच्या इशाऱ्याने काम करत त्या व्यक्तीकडून ‘आर्थिक ‘ संधान साधून आपला उल्लू शिधा करण्याच्या बेताने त्या राजकीय व्यक्तीस निवडणुकीच्या कामादरम्यान जाणीवपूर्वक मदत करीत आहे.निवडणुकीच्या कामकाजातील गोपनीय माहिती त्या राजकीय व्यक्तीला पूरवित असल्याचा आरोप आहे.हे कितपत योग्य आहे?

    तरी निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या कार्यक्रमादरम्यान आपल्या कामकाजात खूप मोठा चुका करणाऱ्या,निवडणुकीच्या कामकाजाचे कुठलेही ज्ञान नसणारा,लोकांशी उर्मट व अरबटपणे वागणाऱ्या तसेच निवडणुकीचे कामकाज एखाद्या राजकीय व्यक्तीच्या दबावातून करीत असणाऱ्या साकळीच्या तलाठी महाशायंवर निवडणुकीच्या कामात कसूर केल्याप्रकरणी कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच त्यांच्या बेजबाबदारपणाच्या कर्तव्यातून निवडणुकीच्या दरम्यान कुठलाही वाद उत्पन्न होऊ नये म्हणून त्यानंतर त्यांच्यावर निवडणुकीबाबत कुठलीही कामकाज देऊ नये.त्यांना त्या कामातून बडतर्फ करण्यात यावे.तसेच माझ्या अर्जाची प्रशासनाकडून तात्काळ दखल घ्यावी असे मनोज (मनु) निळे यांनी अर्जात नमूद केलेले आहे.

अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य),गृहमंत्री(महाराष्ट्र राज्य),म.राज्य निवडणूक आयुक्त(मुंबई),उपविभागीय अधिकारी साहेब (फैजपुर) यांना पाठविण्यात आलेल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here