माणगांव तालुक्यातील कोल्हाण या गावी येथे रक्षाबंधन चे औचित्य साधून एक राखी देशासाठी एक अनोखा उपक्रम…

✍️सचिन पवार 

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. आज शुक्रवारी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून एक राखी देशासाठी या उपक्रमांतर्गत माणगांव तालुक्यातील कोल्हाण येथे रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी माणगांव पोलीस खात्यातील पोलीस उपअधीक्षक श्री.पोदुकुळे माणगांव पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक श्री. आश्वर, पोलीस उप निरीक्षक गायकवाड, पो. डोईफोडे व सर्व स्टाफ यांनी उपस्थिती दर्शवली.पोलिस बांधव २४ तास समाजाचे रक्षण करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी कोल्हाण गावच्या सर्व लहाना पासून वृद्ध माहिलांनी राखी बांधली. यामध्ये एक वेगळी आनंदाची अनुभूती मिळाली. 

आपल्या शहरातील सर्व माता भगिनीचे रक्षण आजपर्यंत तुम्ही पोलीस बांधव करीत आहात तसेच असेच रक्षण करावे, अशी ओवाळणी यावेळी मागितल्याचे कोल्हाण गावच्या महिलांनी यांवेळी सांगितले.यावेळी कोल्हाण गावच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलीस कर्मचाऱ्यांना बांधल्या.वय वर्ष 14 ते 70/80 वयाच्या चिमुकल्या पासून वृद्ध महिला पर्यंत महिलांनी राखी बांधल्याने पोलिस कर्मचारी भारावले होते. सदर या रक्षाबंधनचा ऑचित्य साधून आम्ही आज नाही तर तुम्ही जिथे कुठे असाल किंवा जिथे कुठे तुमची बद्दली होणार त्या ठिकाणी तुम्हाला रक्षाबंधन दिवसी राखी बांधू .असे कोल्हाण गावच्या महिलांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here