आगामी गणपती उत्सव व ईद मिलादून नबी सण एकत्र

आगामी गणपती उत्सव व ईद मिलादून नबी सण एकत्र येत असल्यामुके नेरळ पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

आगामी गणपती उत्सव व ईद मिलादून नबी सण एकत्र

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ:आगामी गणेशोत्सव व ईद मिलादून नबी हे दोन्ही सण एकत्र येत असल्यामुळे नेरळ पोलीस ठाणे येथे दिनांक ०२. ०९.२०२४ संध्याकाळी ६ वा. उप विभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे यांच्या अध्यक्षते खाली प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या उपस्तीत शांतता कमिटीची बैठक पार पडली. ह्या मध्ये प्रामुख्याने दोनी सण म्हणचे गणपती उत्सव व ईद मिलादून नबी हे सण येत असल्यामुळे नेरळ परिसरात शांतात राखावी म्हणून दर वर्षीप्रमाणे नेरळ पोलीस ठाणे मिटिंग चे आयोजन करण्यात आले.

या सभेमध्ये माजी सरपंच सावळाराम जाधव यांनी वाहतुकीच्या समसेवर उपाय योजना करण्याचे सुचविले. तर वकील सुमित साबळे यांनी ट्राफिक सिग्नल लावण्यात यावे याची मागणी केली. तर नितीन कांदळगावकर यांनी ज्या गाड्या रस्त्यावर कायम स्वरूपी उभ्या असतात त्यांच्यावर कारवाही करण्यात यावी याची मागणी केली.

महावितरण व ग्रामपंचायत यांना विशेष सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे कायदा व सुव्यवस्था व धार्मिक तेढा निर्माण होऊ नये व बिघडू नये म्हणून विशेष लक्ष यावे अश्या सूचना दिल्या. नेरळ परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. कोठेही काही अनुचित झाले तर ते आपण मिटवण्याच प्रयत्न करारायला पाहिजे. नाही तर पोलिसाना कळवले पाहिजे. पोलिसांना गणेशोत्सव म्हणजे वार्षिक पेपर सारखाच असतो त्या मुळे आम्ही नेहमीच सतर्क असतो. अशे टेळे यांच्या कडून करण्यात आले. तर आय्युब टीवाळे यांनी सांगितले कि १९७० पासून नेरळ परिसरात अध्याप काही अनुचित पत्रकार घडला नाही.
नेरळ बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त सुरु केला आले तसेच सतत पेट्रोलिंग केली जात असून अत्याधुनिक सी. सी. टीव्ही यत्रांणा चालू आहे व त्या द्वारे सतत लक्ष असणार आहे असे स.पो.नि. शिवाजी ढवळे यांनी सांगितले.

ह्या मिटिंग मध्ये सावळाराम जाधव, अंकुश दाभणे, आरीफ आ कादीर भाईजी, आयुब टीवाळे, सरफराज नजे, वकील सुमित साबळे, सुनील पारधी, नितीन कांदळगावर, संजय अभंगे, संतोष पेरणे, अजय गायकवाड, झमन पालटे, कमिल भाईजी अशे, गोरख शेप, रोहिदास मोरे, सुनील पारधी असे एकंदरीत २५ जण उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here