म्हसळा शिवसेना (शिंदे गट ) पक्षाच्या वतीने विद्यार्थ्याना वह्या वाटप
म्हसळा तालुका : (संतोष उध्दरकर.)
म्हसळा: दि.१ ऑगष्ट रोजी म्हसळा शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन प्रभु श्री विश्वकर्मा सुतार समाज सकलप यांच्या वतीने सकलप येथे करण्यात आले होते, यावेळी सकलप गावातील दुसरी ते बारावी मधील एकुण ८८ विद्यार्थ्यांना शिवसेना साळविडे विभाग प्रमुख नामदेव घुमकर यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन खुप मोठे व्हावे, स्पर्धा परिक्षा द्यावे उत्तम शिक्षणासाठी शिवसेना सदैव विद्यार्थी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे विभाग प्रमुख नामदेव घुमकर यांनी कार्यक्रम ठिकाणी सांगितले, यावेळी उपस्थित साळविंडे विभाग प्रमुख नामदेव घूमकर, तोंडसुरे गाव अध्यक्ष हरिचंद्र नाक्ती, सकलप सुतार समाज उपाध्यक्ष सुयोग सुतार, मंडळ अध्यक्ष जितेंद्र सुतार, जेष्ठ कार्यकर्ते नथुराम सुतार, माजी सरपंच एल. पी. खोत, सेक्रेटरी अक्षय सुतार, मंगेश सुतार, आदी मान्यवर उपस्थित होते.