कोरोना परीस्थितीत शेलूबाजार येथे 31 युवकांचे रक्तदान
विनायक सुर्वे प्रतिनीधी
शेलूबाजार:- सद्या रक्ताचा सर्वत्र तुटवडा आहे आणि कोविड मुळे अनेक ठिकाणी रक्ताचा झीरो स्टॉक आहे, अशा स्थितीत रुग्णांना रक्त मिळावे मनुन रुग्णसेवा युवा ग्रुप व स्वराज्यविर सामाजिक संघटना यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले, आणि युवकांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद देत 31 युवकांनी रक्तदान केले,
रक्तदान शिबिराची सुरुवात महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर लगेच रक्तदान शिबिराला सुरुवात झाली,
शिबिरस्थळी संपूर्ण काळजी, सोशल डिस्टन्स, प्राथमिक तपासणी, सॅनिटायझेशन चे नियम पाळून रक्तदान शिबिर पार पडले
सोबतच येणाऱ्या प्रत्येक रक्तदाते मंडळीची संपूर्ण पूर्व आरोग्य तपासणी झाली सोबतच मास्क, sanitization व सोशल डिस्टन्स याचा परिपूर्ण पालन केल्या गेले त्यानंतर प्रत्येक रक्तदाते युवकाला रक्तदान करताना वेगळी वेगळी बेडशीट देण्यात आली आणि वेळोवेळी सर्व काळजी घेतल्या घेली,
रक्तदान शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी श्री अरविंद भगत सर, जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीचे श्री दंदे सर, डॉ. नितीन धोटे सर, संतोष लांभाडे, सुरेंद्र राऊत, पांडूभाऊ कोठाले, दौलतभाऊ इंगोले, राम सुर्वे, शुभम डोफेकर, चेतन येवले, राहुल रोकडे, पत्रकार पवन भाऊ राठी, प्रवीण राऊत, रवि वानखडे, सूरज हांडे, चंद्रकांत ठाकरे, महेंद्र सावके, गोपाल घुगे, यादव उगले, नितीन खराबे, सोनबा भगत, संदीप नपते, हरीश सावके, अभिषेक देवलाल सावके, मनोज सावके,धनराज, सिद्धेश्वर खंडारे, योगेश्वर राऊत, गौरव चौधरी, कृष्णा गावंडे, आदित्य इंगोले, सूरज ठाकरे, मयूर ठाकरे, दिनेश फुके, शिवा सावके सह संपूर्ण आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेलूबाजार तसेच रक्तपेढी चे कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे रुग्णसेवा ग्रुप व स्वराज्यविर संघटन च्या वतीने आभार मानले.