*कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना युपी पोलिसांकडून धक्काबुक्की;खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला निषेध…*
मुंबई दि. १ ऑक्टोबर – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली हे अतिशय निंदाजनक असून या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जाहीर निषेध केला आहे.
कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे…बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी संसद सदस्य आणि कॉंग्रेसचे नेते असलेले राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. त्याठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे असा सवाल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.
सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न
सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व
आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.