उत्तरप्रदेशातील हाथरस येथील मागासवर्गीय तरुणीवर अमानवीय अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या – भाऊ निरभवणे
रिपब्लिकन पक्ष खोरिप ची मागणी
मुंबई / प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दिल्लीतील निर्भया सारख्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. मनीषा बाल्मीकि 19 वर्षीय मागासवर्गीय तरुणीवर माणुसकीला काळिमा फासणारी क्रूर अत्याचाराची घटना घडली आहे. सामूहिक व अमानवीय अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा द्या व पीडित तरुणीच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय द्या अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पक्ष खोरिपचे प्रदेशाध्यक्षा भाऊ निरभवणे यांनी केली आहे.यासंदर्भात राज्यातील विविध ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि ५ औक्टोंबर २०२० रोजी सकाळी ११ वा निदर्शने करून निवेदन देण्यात येणार असल्याचे भाऊ निरभवणे यांनी सांगितले.यावेळी भाऊ निरभवणे म्हणाले कि यूपी सरकार व पोलीसांचा निषेध करून तीव्र संताप केला पाहिजे. या घटनेनंतर संपूर्ण राज्य व देशभरात संताप व्यक्त होत असताना उत्तर प्रदेशमध्ये महिला असुरक्षित असल्याचे सातत्याने समोर आले आहे,तेथील गुंडाराज कधी थांबणार असा सवाल रिपब्लिकन पक्ष खोरिपच्या वतीने उपस्थीत केला आहे. तेथील या गँगरेप बाबत योगी सरकार निष्क्रिय दिसून आले आहे. समाज मनांचा प्रचंड उद्रेक झाल्यानंतर पोलिसांनी आठ दिवसानंतर तक्रार दाखल केली. याचाही निषेध यावेळी दर्शविण्यात आला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हा प्रकार जातीयवादी मनोविकृतीतून घडला आहे. दलित समाजावर होणारे अत्याचार दिवसागणिक वाढत चालले आहे हे थांबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत. तसेच त्या नराधमांना फाशी देऊन आमच्या बहिणीला न्याय द्या अशी मागणी प्रदेशाध्यक्षा भाऊ निरभवणे यांनी केली आहे.