पत्नीच्या विरहाने एका पतीने केली आत्महत्या.
प्रशांत जगताप प्रतिनिधी
नागपूर:- आज कोरोना वायरसने अनेकाचे जीव घेतले, कुणाचे पती, कुणाची पत्नी, तर कुणाचे रिस्तेदार नागपुर जिल्हात कोरोना वायरस ने पत्नीची मृत्यु झाल्या नंतर काल पत्नीच्या विरहाने पती ने आत्महत्या केल्याची हृदय हेलवनारी घटना घडली.
पत्नीच्या विरहात पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना वाठोड्यातील पवनशक्तीनगर येथे घडली. चंद्रशेखर पुरी वय ३५,असे मृतकाचे नाव आहे. ते खासगी काम करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी चंद्रशेखर यांचे लग्न झाले. दोन आठवड्यापूर्वी करोनामुळे त्यांच्या पत्नीने निधन झाले. तेव्हापासून ते तणावात होते. बुधवारी रात्री चंद्रशेखर यांनी विष प्राशन केले. नातेवाइकांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.