रत्नागिरी जिल्हयात सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल मंजूर करण्याची भारतीय पदवीधर प्रतिष्ठाणची उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

28

रत्नागिरी जिल्हयात सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल मंजूर करण्याची भारतीय पदवीधर प्रतिष्ठाणची उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात वाढती लोकसंख्या पाहता जिल्हयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची आवशक्यता आहे. रत्नागिरी जिल्हयात शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता,आरोग्य सुविधांचा अभाव पाहता पाहता ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्हयात मल्टीस्पेशलीटी ऐवजी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल त्वरित मंजूर करण्यात यावे आणि याबाबत आपण स्व:ता पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा या मागणीचे लेखी निवेदन भारतीय पदवीधर प्रतिष्ठानने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांना (दी.30 सप्टेंबर) बुधवारी दिले.

media varta news award 2025

रत्नागिरीमध्येअगदी छोट्या सर्जरीसाठी किंवा अपघात झाल्यावर रुग्णांना नाइलाजास्तव मुंबईतील KEM, सायन, नायर, जेजे आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य सुविधेअभावी अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. रत्नागिरी जिल्हयात गेली तीन वर्षांपासून करोना योध्दा कै.शशिकांत धाडवे यांनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची मागणी केली होती. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे, समाजात एक स्वच्छ प्रतिमा म्हणून त्याची ओळख होती. कै.धाडवे हे व्यवसायाने सी. ए. होते. रत्नागिरी जिल्ह्यात मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मंजूर होण्यासाठी त्यांनी तीन वर्षे अनेकदा मागण्या,पाठपुरावा,आंदोलने केली. शासन दरबारी त्यांच्या मागण्या धूळ खात पडल्या आहेत.याबाबत पदवीधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल अनंत पवार यांनी बुधवारी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांची वयक्तिक भेट घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल मंजूर करण्याची मागणी केली. यावेळी अजित पवार यांनी पालकमंत्र्याना सुचना देऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तर विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी शासनाला कार्यवाहीचे निर्देश दिले आणि रत्नागिरी जिल्हयात सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल मंजूर करण्याचे आश्वासन दिले.