Home latest News मध्य प्रदेश मध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून फेकले रस्त्यावर
मध्य प्रदेश मध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून फेकले रस्त्यावर
खरगोन: आज महिलावर होत असलेले अत्याचार बघुन देशात आज महिला सुरक्षाचा बोध होत आहे. उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये भावाला मारहाण करून त्याच्या १६ वर्षीय नाबालिक बहिणीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. घटनेनंतर आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.
मिडिया वार्ता न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, तीन आरोपी रात्री पाणी पिण्यासाठी शेतावर आले होते. भावाला मारहाण केल्यानंतर १६ वर्षीय मुलीला पळवून नेले. त्यानंतर बलात्कार केला. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली
असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
झिरन्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारूगढमध्ये शेताची राखण करणाऱ्या १६ वर्षीय मुलगी आपल्या भावासह झोपडीत राहतात. मध्यरात्री तिघे जण तिथे आले. पाणी पिण्याचा बहाणा केला. पाणी पिऊन गेल्यानंतर ते पुन्हा दहा मिनिटांनी तेथे आले. त्यांनी तिच्या भावाला मारहाण केली आणि मुलीला पळवून नेले. तिघा जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रस्त्यावर फेकून पसार झाले. पोलीस अधीक्षक शैलेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, पीडित मुलगी आणि तिचा भाऊ शेतावर होते. रात्री तिघे जण त्यांच्या झोपडीत आले. पाणी पिण्याच्या बहाण्याने आले आणि त्यांनी मुलीला पळवून नेले. भावाला मारहाण केली. पीडितेने सांगितले की तिघांनी बलात्कार केल्यानंतर रस्त्यावर फेकून पसार झाले.
Post Views: 135