हिंगणघाट “भूखंड झाला श्रीखंड” अवैध लेआउट मध्ये प्लाट खरेदी करुन लोकाची फसवणुक.

हिंगणघाट “भूखंड झाला श्रीखंड” अवैध लेआउट मध्ये प्लाट खरेदी करुन लोकाची फसवणुक.

अवैध लेआउट मध्ये बिल्डर तर्फे कुठलीही सुविधा नाही, अशा लेआउट मध्ये प्लाट खरेदी करुन मोठ्या प्रमाणात फसत आहे हिंगणघाटकर.

हिंगणघाट "भूखंड झाला श्रीखंड" अवैध लेआउट मध्ये प्लाट खरेदी करुन लोकाची फसवणुक.
हिंगणघाट “भूखंड झाला श्रीखंड” अवैध लेआउट मध्ये प्लाट खरेदी करुन लोकाची फसवणुक.

✒ मुकेश चौधरी ✒
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
हिंगणघाट :- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध लेआउट टाकुन बिल्डर कडुन हिंगणघाट मधील सामान्य नागरिकांना फसवल्या जात असल्याची माहिती मिडिया वार्ता न्युज जवळ आली आहे. त्यामूळे वर्धा जिल्हा आणि हिंगणघाट मधील प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

हिंगणघाट तालुका आणि शहरात चार भोवताल होत असलेल्या अवैध लेआउट मधील प्लाटाना रोखण्याकरिता हिंगणघाट तालुक्यातील महसूल विभाग आणि नगर पालिका यांच्या वश नाही आहे अस चित्र सध्या तरी दिसून येत आहे. परंतु, तुम्ही कोणत्या ही लेआउट धारकाकडुन प्लाट खरीदी करत असल्यास या गोष्टीची जानकारी जरूर घ्या की, बिल्डर द्वारा टाकण्यात आलेले लेआउट मधील प्लाटचा लेआउट प्लान NA TP झाले की नाही. त्याला शासनाने नियमानुसार परवागी दिली की नाही. कारण की, हिंगणघाट येथे बिल्डरने अवैध लेआउट टाकुन नागरीकाकडुन मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आहे. परंतु त्यांना कुठलीही सुविधा देण्यात आली नाही.

हिंगणघाट शहरालाच लागुन असलेल्या ग्रामीण भागात कृषक शेतजमीनी घेऊन मोठ्या प्रमाणात लेआउट टाकून प्लाट विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. हिंदु देवी देवताच्या नावाने लेआउटच नाव ठेऊन बिल्डर सरसकट लोकाची फसणुक करत असल्याचे समोर येत आहे. हिंगणघाट मधील एका किरायाने राहणा-या गरीब व्यक्तीने इकडुन तिकडून पैस्याची जमवा जमव करुन प्लाट करेदी केला. 2 लाख 80 हजारात सौधा झाला करारनामा करते वेळी 1लाख 80 हजार दिले. पण त्या लेआउटला शासनाची परवागीच नाही, त्यात कुठलेही विकास कार्य करण्यात आलेले नाही. रस्ता, सांडपाणी पाणी वाहुन नेण्यासाठी नालीची व्यवस्था नाही, इलेक्ट्रीक पोल नाही. अशा परस्थितीत त्या गरीब किरायादार व्यक्तीने त्या अवैध लेआउट मधील जंगलात झोपडी बांधली आणि आपल्या परीवाराबरोबर राहत आहे. लेआउट अवैध असल्यामुळे विज मिटर आल नाही म्हणुन बाजूच्या शेतातून अवैध विज कनेक्शन घेतल आणि राहत आहे.

नाही मिळत आहे प्लाट धारकांना जरूरी सुविधा.

लेआउट टाकणा-या बिल्डरना प्लाट टाकता वेळेस लेआउट मध्ये रस्त्ये, नाली, विज, पानी, बगीछा इत्यादि मूलभूत सुविधा सुनिश्चित करावी लागते त्यानंतर शासना तर्फे लेआउट प्लान पास करावा लागते. परंतु, हिंगणघाट शहरातील पूर्व क्षेत्रात येणा-या परिसरात अवैध लेआउट वर बिल्डर द्वारा लेआउट प्लान मंजूरी वीणा प्लाट टाकून नागकरीकांना विकण्यात आले आहे. त्या प्लाट धारकांना कुठलीही सुविधा उपलब्ध नाही केल्या गेली. त्यात हिंगणघाट मध्ये शेकडोच्या वर लोकाची फसवणु झाल्याचे समोर येत आहे.

अवैध लेआउट माफीया तर्फे पत्रकारांना धमकी.

हिंगणघाट मोठ्या प्रमाणात प्लाटच्या नावावर सुरु असलेली लोकांची फसवणुकीवर पत्रकार आपल्या लेखणी ने प्रहार करत आहे त्याना अशा माफिया कडुन सतत धमकी दिल्या जात आहे. या अवैध लेआउट वर कारवाई करावी अशी मागणी मिडिया वार्ता न्युज तर्फे वर्धा जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्री यांच्या कडे केली आहे.