गांधी जयंती निमित्त घुग्घुस नगर परिषदतर्फे सायकल रॅली, सफाई कामगारांचा सत्कार व वृक्षारोपण.

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
घुग्घुस:- 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता घुग्घुस नगर परिषद व घुग्घुस पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “आझादी का अमृत महोत्सव” स्वच्छ सर्वेक्षण 2022 तथा माझी वसुंधरा अभियान अंतर्गत व 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्याने सायकल रॅली, सफाई कामगारांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. घुग्घुस पोलीस स्टेशन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी घुग्घुस नगर परिषदेचे सफाई कामगार पट्टूबाई शेट्टीयार व लक्ष्मीबाई येरलावार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
घुग्घुस पोलीस स्टेशन येथून सायकल रॅली काढण्यात आली. बसस्थानक चौक मार्गे घुग्घुस-चंद्रपूर मार्गांवरील प्रियदर्शनी कन्या शाळा पर्यंत सायकल रॅली गेली तिथे वृक्षारोपण करण्यात आले व परत घुग्घुस येथे सायकल रॅली समाप्त करण्यात आली.
यावेळी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, काँग्रेसचे शहराध्य राजू रेड्डी, कार्यालय अधीक्षक अभिषेक जांभुळे लेखापाल विक्रम क्षीरसागर, पाणी पुरवठा अभियंता अमर लाड, नप लिपिक विठोबा झाडे, सुरज जंगम, कर्मचारी शंकर पचारे, हरी जोगी, अशोक रसाड, रवींद्र गोहकार, मोहसीन कुरेशी, सचिन माशिरकर उपस्थित होते.