आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविदयलयाचा हरी सरोदे सहायक वनसंरक्षक (वर्ग-1)पदी निवड.

आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविदयलयाचा हरी सरोदे सहायक वनसंरक्षक (वर्ग-1)पदी निवड.

आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविदयलयाचा हरी सरोदे सहायक वनसंरक्षक (वर्ग-1)पदी निवड.
आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविदयलयाचा हरी सरोदे सहायक वनसंरक्षक (वर्ग-1)पदी निवड.

बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित व आदित्य शिक्षण संस्था संचालित आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी हरी सरोदे यांची सहायक वन संरक्षक वर्ग -1 अधीकारी या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनसेवेच्या परीक्षेततुन निवड झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा यांनी दिली. विशेष बाब म्हणजे घरात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, आर्थिक बाजू लंगडी असूनही आदित्य कॉलेज मधून बी टेक कृषी अभियांत्रिकी पदवी घेतली व पदव्युत्तर शिक्षण एम टेक कृषी अभियांत्रिकी, राहुरी विद्यपीठातून झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा सुरू करण्याच्या निर्णयाला घरच्यांनी पाठिंबा दिला अनेक चढ उतार अनुभवत, अनुभवातून शिकत कोणताही कलाससेस न लावता यश गाडण्या च्या जिद्दीने हा प्रवास किमान 15-20 मुख्य परीक्षा, MPSC च्या 5 मुलाखती देऊन पोलीस उप निरीक्षक, राज्यसेवेतून नायब तहसीलदार आणि आता फॉरेस्ट मध्ये Assistant Conservator of Forest (class-1) या पदावर हरी सरोदे याची निवड झाली.

अभिमानाची बाब म्हणजे हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिपळगाव दानी या गावचा असून साध्या पी.एस.आय या पदावर मुंबईत कार्यरत आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्रचार्य श्याम भुतडा यांनी दिली. सदरील निवडीबाबत संस्थेचे अध्यक्ष मा. सुभाषचंद्रजी सारडा साहेब यांनी विद्यार्थ्यांचे फ़ोन वरून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थाचे संचालक श्री, शरदचंद्रजी सारडा साहेब, संचालिका डॉ. आदितीताई सारडा मॅडम, सी.ए.गिरीषजी गिल्डा, जिल्हा बँकेचे माझी अध्यक्ष श्री. आदित्यजी सारडा, प्राचार्य डॉ, अरुणजी मुंडे, श्याम भुतडा सर, कल्याण नागरगोजे सर,. डॉ.सतीश कचरे सर यांनी शब्द सुमनाने स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.