गांधी जयंतीदिनी नथराम गोडसेच्या समर्थनात ट्रेंड; अॅड. यशोमती ठाकूर यांनी केली ‘ही’ मागणी.

गांधी जयंतीदिनी नथराम गोडसेच्या समर्थनात ट्रेंड; अॅड. यशोमती ठाकूर यांनी केली ‘ही’ मागणी.

गांधी जयंतीदिनी नथराम गोडसेच्या समर्थनात ट्रेंड; अॅड. यशोमती ठाकूर यांनी केली 'ही' मागणी.
गांधी जयंतीदिनी नथराम गोडसेच्या समर्थनात ट्रेंड; अॅड. यशोमती ठाकूर यांनी केली ‘ही’ मागणी.

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी

मुंबई,दि.2 ऑक्टोबर :- महात्मा गांधीजयंतीनिमित्त ट्विटरवर अनेक भारतीयांकडून गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्याकडून जयंतीनिमित्त गांधीजींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात येत आहे. सकाळपासून ट्विटरवर गांधी जयंतीनिमित्त #GandhiJayanti, महात्मा गांधी हा ट्रेंड सुरू आहे, तर दुसरीकडे #नाथूराम_गोडसे_जिंदाबाद हा ट्रेंड सुरू आहे. गांधी जयंतीदिनी नथुराम गोडसेच्या समर्थकांकडून जयघोष केला जात आहे. यामुळे समाजमाध्यमात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर गोडसेच्या जयघोषावर काँग्रेसनेही आक्षेप घेतला आहे.

देशातील दिग्गज नेत्यांकडून महात्मा गांधी यांना अभिवादन केले जात आहे. तर दुसरीकडे महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे जिंदाबाद हा ट्रेंड ट्विटरवर काही लोकांकडून चालविला जात आहे. या ट्रेंडवर काँग्रेसच्या महिला नेत्या, महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी गोडसेच्या आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी दहशतवादी नथुराम गोडसे यांच्या समर्थनात ट्रेंड चालवणाऱ्यांचे अकाऊंट बंद करण्यात यावे आणि सदर ट्रेंड हा ब्लाॅक करण्यात यावा, अशी मागणी ट्विटर इंडियाकडे केली आहे.

याचबरोबर मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर करत गोडसेच्या समर्थनार्थ ट्रेंड चालवणाऱ्यांचे अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे. ठाकूर म्हणाल्या, ‘आज २ आॅक्टोबर असून या दिवशी आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आठवण काढत असतो. मात्र, आज काहींना नथुराम गोडसेची देखील आठवण येत आहे. नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता. आज गोडसेच्या समर्थनात मोठे ट्रेंड चालविले जात आहे. यामुळे माझी मागणी आहे की, ट्विटर इंडियाने गोडसेचा ट्रेंड चालवणाऱ्यांचे अकाऊंट बंद करावे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेरच्या देशात जातात, तेव्हा महात्मा गांधीजींच्या समर्थनात बोलत असतात. मात्र, त्याचवेळी देशात नथुराम गोडसेच्या समर्थनात ट्रेंड चालविले जात आहेत. यामुळे ट्विटर इंडियाने कारवाई करून काही अकाऊंट बंद केले पाहीजे.’ अॅड. यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या.