शेतकऱ्यांच्या शेतपिकांची नासाडी करणाऱ्या मुजोर रानटी डुकरांचा बंदोबस्त करा.
हिवरा येथील शेतकऱ्यांचे वनविभागाला निवेदन…

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- गाव पातळी पासून देशासह संपूर्ण नागरिकांचा पोशिंदा शेतकरी आहे. हाच बळीराजा या रानटी डुकरांच्या हैदोषाने परेशान आहेत. परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात धान रोवणी होऊन गर्भाला आलेला आहे, कापसाची बोंडे फुटायची आहेत, सोयाबीन पिकाला शेंगा लागून दाणा भरत आहे. तुरीच्या झाडांची वाढ झालेली आहे. सर्व पिके एका महिन्यात हातात येण्यालायक असून, या मुजोर रानटी डुकरांचा कळप रात्रौ आणि दिवसाढवळ्या पिकांची नासधूस करीत आहेत.
बिचारा शेतकरी मोठ्या कष्टाने धान,कापूस,तुरी,सोयाबीन, अश्या अनेक प्रकारची पिकांची महागडी बीजाई घेऊन लावणी केली आहे,यातच धान व कापूस पिकांवर होत असलेला इतर खर्च परवडणारा नसून यातच हे रानटी डुकरं भरदिवसा पिकांवर हैदोस घालून नुकसान करतात. शेतकरी त्या रानडूकराना हकलायाला गेल्यास अंगावर धाऊन येतात. इतकी रानडुकरे मुजोर झाली आहेत.
अश्या या नासाडी करणाऱ्या मुजोर रानटी डुकरांचा बंदोबस्त करावा. हिवरा गावातील शेतकऱ्यांच्या या मागणीला धरून संबंधित वन विभागाला तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ग्रा.प. हिवराचे सदस्य श्री.जितेंद्र गोहणे, माजी उपसरपंच श्री. प्रकाश हिवरकर यांनी निवेदनातून केली.