घुग्घुस येथे 4 लाखाच्या कोळशाची अफरातफर, 1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

घुग्घुस, 1 ऑक्टोबर: घुग्घुस येथे 4 लाख रुपयांच्या कोळशाची अफरातफर केलाचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी तिघांना अटक केली.

ट्रकमालक रोहित संजय जयस्वाल (28, रा. विद्या टॉकीज जवळ, घुग्घुस) याने गुरुवारी कोळशाची अफरातफर झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून कलम 407 (34) गुन्हा नोंद करून आरोपी ट्रक चालक प्रदीप बापूराव वासेकर (42, रा. उडिया मोहल्ला, घुग्घुस), भावेश छत्रपती पाटील (24, रा. अमराई वॉर्ड, घुग्घुस), राकेश चंद्रय्या माटला (25, रा. तिलक नगर, घुग्घुस) या तिघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

26 सप्टेंबर रोजी आरोपी ट्रकचालक प्रदीप वासेकर याने उसगाव जवळील गुप्ता वॉशरीतून ट्रकमध्ये कोळसा भरून नेला. परंतु, त्याने ताडाली सायडींगवर कोळसा खाली केला नाही. प्रदीप वासेकर हा आपल्या मालकास गुप्त वॉशरीतून कोळसा भरून गेल्याची व ताडाळी सायडींगवर कोळसा खाली केल्याची पावती देत होता. परंतु, त्याने काही दिवस पावती देणे बंद केले. ट्रकचे मालक रोहित जयस्वाल याने वासेकर यास पावती देण्यासाठी सांगितले असता तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे जयस्वाल यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता 4 लाख रुपये किंमतीच्या 33 टन कोळशाची अफरातफर झाल्याचे उघडकीस आले. आरोपीने साथीदारासह कोळसा दाखविला पोलिसांनी 1 लाख 20 हजारांचा 10 टन कोळसा जप्त केला.

उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी व इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलिस उप निरीक्षक गौरीशंकर आमटे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here