मालेगाव बायपास रस्त्यावरील अपघातात २ गंभीर जखमी 

अजय उत्तम पडघान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी 

मो: 8554920002

मालेगांव,30 सप्टेंबर: नागपूर-मुंबई महामार्गावरील मालेगाव शहराजवळील बायपासवर असलेल्या कैथल जिंद ढाब्यासमोर 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास औरंगाबादहून नागपूरकडे जाणार्‍या अशोक लेलँड दोस्त या मालवाहू वाहनाला ट्रकने धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

नागपूर मुंबई महामार्गाच्या बायपासवर कैथल जिंद धाब्यासमोर 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता औरंगाबादहून नागपूरकडे जात असलेले अशोक लेलँड दोस्त एम.एच. 49 ए. टी. 8645 ला समोरून येणारा ट्रक क्रमांक आर. जे. 21 जी. बी. 4543 च्या चालकाने भरधाव वेगात व बेदरकारपणे ट्रक चालवत जोरदार धडक दिली. 

या अपघातात अशोक लेलँड दोस्तचा चालक रोहित नंदलाल जरेल वय 28 वर्ष व धनराज शेषराव बारापात्रे वय 27, दोघे रा. नागपूर हे गंभीर जखमी झाले असून, दोन्ही जखमींना वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद जखमीचा मित्र आयुष रघुनाथ आमनेरकर वय 20 वर्ष राहणार नागपूर याने 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता मालेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली नोंदविल्यानंतर गुन्हा क्रमांक 400/2022 नोंदवून भादवि च्या कलम 279, 337, 338 सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास कोकाटे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here