शतकाकडे वाटचाल करण्या-या सावलीतील ग्रामोद्योगाला अखेरची घरघर, ईमारत व कामगारांच्या समस्या कडे दुर्लक्ष, महात्मा गांधी यांचा आठवडाभर मुक्काम असलेल्या खादी ग्रामोद्योगाकडे राजकीय नेते लक्ष देतील का?
बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधि
मो: 7263906273
सावली: स्वातंत्र्याच्या पूर्वी पासून खादी पासुन तयार करण्यात आलेल्या सुती धोतरा साठी प्रसिद्ध असलेल्या सावली येथील खादी कारखान्यातील.सुतकताई उद्योग हा एकवेळ बारमाही रोजगार देणारा उद्योग ठरला होता ,परंतु शतकाकडे वाटचाल करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाला अखेरची घरघर लागल्याचे दिसून येत आहे, पडक्या ईमारत व कामगारांच्या समस्या जैसे थे असल्याने राष्टपिता गांधी यांच्या पदस्पर्शाने व मुक्कामाने पावन झालेले सावलीतील खादी ग्रामोद्योगशेवटची घटका मोजत आहे..
सुतापासुन.तयार करण्यात आलेल्या सुती धोतर ,नाटकीन ,टावेल बाजार पेठेत त्या वेळेस विकले जात होते परंतु खादी कपड्यांना स्वतंत्र बाजार पेठ नव्हती ,त्यामुळे कामगारांच्या ,विणकरांच्या अनेक समस्या होत्या, असे असताना सावली येथे तयार झालेल्या सुती धोतरांची मागणी संपूर्ण भारतात होती ,त्यावेळेस स्वदेशी ,स्वराज्य ची चळवळ सुरू होती ,याची माहिती म.गांधी यांना मिळतात त्यांनी सावली येथील खादी ग्रामोद्योगाला 1933 आणि 1936 अशा दोनदा भेटी दिल्या व.कामगारांना योग्य मोबदला व स्वतंत्र बाजारपेठेची व्यवस्था केली, महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने सावली गाव पावन झाले ,त्या वेळेस अखिल भारतीय सेवा संघाचे अधिवेशन सावली येथे घेण्यात आले ,गांधीजी सोबत दारु बंदीचे कट्टर पुरस्कर्ते जमनलाल बजाज,सुशिला नायर, विनोबा भावे सह कांग्रेस चे अनेक मोठे नेते सावलीत मुक्कामाने होते,
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे खादी ग्रामोद्योग गाची स्थापना 1925 मध्ये करण्यात आली, नागविदर्भ चरखा संघाच्या माध्यमातून सावली गावात मोठ्या प्रमाणात सुत कताई,विण ई,रंगाई धुलाई चे काम केले जात होते ,गावातील अनेक कुटुंबाचे प्रपंच भागविणारा हा उद्योग होता ,बारमाही रोजगार देणारा हा उद्योग होता , असे असतानाही शतकाकडे वाटचाल करणाऱ्या खादी ग्रामोउद्योगाला शेवटी घटका लागलेली दिसत आहे ,पडक्या ईमारती आहेत, कामगारांच्या समस्या जैसे थे आहेत , सोबतच मागील दोन वर्षापासून असलेल्या. कोरोना काळात चरखा स़घात सुती विणाईसाठी लागणारा कच्च्या माल पेरु येत नसल्याने सुत कताई बंद केल्या गेली, कामगारांच्या समस्या सह पडक्या ईमारती ग्रामोद्योगाची साक्ष देत आहे.
राष्टपिता महात्मा गांधींच्या जयंती निमित्त आता तरी राजकीय नेते ,पुढारी यांनी खादी ग्रामोद्योग कडे लक्ष देऊन शतकात कडे वाटचाल करणाऱ्या खादी उद्योगांना चालना द्यावी ,प्रत्येक भारतीयांना एक तरी खादी कापड वापरावा अशी सक्ती करावी, कामगारांच्या समस्या निवारण करून कल््याण मंडळ निर्माण करावे, सध्या स्थितीत कांग्रेस च्या वतीने भारत जोडो यात्रा सुरू आहे ,गांधींजींच्या विचारावर चालणाऱ्या कांग्रेस पक्षाने लक्ष देण्याची गरज भासत आहे ,तात्काळ या कडे लक्ष देऊन शतकी वर्षे साजरा करीत असताना पुन्हा एकदा खादी ग्रामोद्योगांना उभारणी देऊंन चरखा संघाच्या माध्यमातून सुतकताई सुरू करण्यात यावी अशी मागणी सावली वासिय करीत आहेत.