वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे सावली तालुक्यातील शेतपिकाचे मोठे नुकसान

53

वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे सावली तालुक्यातील शेतपिकाचे मोठे नुकसान, वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान झालेल्या शेतीपिकांचे भरपाई द्यावी,नगरसेवक तथा भाजप महामंत्री सतीश बोमावार ची मागणी

बाबा मेश्राम 

सावली तालुका प्रतिनिधी

मो: 7263907273

सावली: सावली तालुक्यात बहुतांश शेती हि जंगला लगत आहे ,त्यामुळे वन्य प्राणी नेहमीच शेतशिवारात वावरताना दिसतात ,एवढेच नाही तर वन्यजीव जीव वाघ, बिबट ,.आदी गावात येऊन सुध्दा पाळीव प्राण्यावर हल्ले करून ठार करताना दिसत आहे त, असेच जंगलालगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात वन्यजीव रानडुक्कर नुकसान करीत आहेत

तालुक्यातील हलके धान पुर्णपणे गर्भावस्थेत झालेला आहे ,असे असताना या वन्यजीव मुळे शेती पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत त्यामुळे उभ्या पिकांची नासाडी होत आहे, या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने चार पाच वेळा पुर परिस्थिती निर्माण होऊन शेतपिकाचे नुकसान झाले, त्यातच आता धानपिके गर्भावस्थेत असताना या वन्यजीव मुळे नुकसान होत आहे त्यामुळे अशा वन्यजीवांचा तात्काळ बंदोबस्त करून ,नुकसान झालेल्या शेतपिकाचे नुकसान भरपाई वनविभागाने द्यावी अशी मागणी भाजपा तालुका सावली चे महामंत्री तथा नगरसेवक सतीश.बोमावार यांनी केली आहे, 

 वनविभागाकडे वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना नाही ,त्यामुळे यावर योग्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे