‘हे घ्या पुरावे’ धनगर ही ‘जात’ आहे.’जमात’ नाही.
ट्रायबल फोरम : राज्यपाल, मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना पत्र
प्रकाश नाईक
नंदुरबार जिल्हा
प्रतिनिधी
मो. 📱 9511655877
नंदुरबार : अनुसूचित जमातीच्या सुचित धनगर ,धनगड हे दोन्हीही शब्द नाहीत. राज्यात ‘धनगड’ ही जमातच नाही.धनगर ही ‘जात’ आहे,’जमात’ नाही. त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या सुचित समावेश करु नये. अशी मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे ट्रायबल फोरम धडगाव तालुकाध्यक्ष संजय पराडके यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या सुचित Dhangad ( धांगड) या शब्दाचे भाषांतर धनगड असे केल्या जात आहे.त्याचे भाषांतर ‘धांगड’ असे हवे आहे.महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक ३६ वर ‘ओराँन’ जमात आहे.तीची पोटजमात धांगड आहे.ओराँन ही भारतातील प्रमुख जमात आहे.तीला ७ राज्याच्या सुचित दर्शविले आहे.महाराष्ट्रात ओराँन, धांगड नाहीतच. पण अनुसूचित जमातीच्या सुचित आहे.संविधान आदेशात प्रमुख जमाती नंतर त्यांच्या पोटजमाती दर्शविल्या आहे.
ओराँनच्या शेतात ,घरी रोजंदार म्हणून काम करणारी धांगड ही जमात होय.या दोन्ही जमातीचे खानपान , रितीरिवाज, प्रथा,परंपरा,विधीसंस्कार सारखेच आहेत.धनगर जातीचा या जमातींशी तीळमात्रही संबंध नाही.
१९११ च्या जनगणनेमधील तक्ता क्रमांक ६ केवळ जातीचा आहे.त्यामध्ये क्रमांक ७ वर धनगर ‘जात’ म्हणूनच नोंद आहे.१९११ मध्ये बाँम्बे प्रेसीडेंन्सी ,सी.पी.अँड बेरार , मराठवाडा या तीन प्रातांत धनगर ‘जात’ म्हणूनच उल्लेख आहे.’जमात’ म्हणून नाही.
१९३१ ची जनगणना जे.एच.हट्टन यांनी केली आहे. ते १९२९ ते १९३३ पर्यंत जनगणना आयुक्त होते.त्यांच्या जनगणनेचा खंड ३ मध्ये पान क्रमांक ६६ वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये क्रमांक ४ वर धनगर जात आहे. खंड दोन मध्ये पान क्रमांक १६६ वर जात क्रमांक ३० वर ‘गडरीया’ नावाच्या मुख्य जातीची नोंद आहे. त्यांच्या उपजातीची नावे भाखड,धनगर आहे. ‘धनगर ही जात आहे, जमात नाही’.
*केंद्र सरकारने आधीच प्रस्ताव नाकारला*
महाराष्ट्र राज्य शासनाने १२ जून १९७९ ला धनगराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता.यावर संबंधित विभागात सखोल चर्चा ही झाली. पण धनगर समाज आदिवासींचे निकष पुर्ण करु शकत नसल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने १९८१ मध्ये आपला प्रस्ताव मागे घेतला आहे.
*न्यायालयानेही ‘जात’च ठरवली*
उत्तरप्रदेशात अलाहाबाद कोर्टात आँल इंडिया धनगर समाज महासंघाने १७/७/२००९ रोजी याचिका दाखल केली होती. त्याचा क्रमांक रिट सी.नं. ४०४६२ / २००९ असा आहे. न्यायालयाने १४/३/२०१४ रोजी निकाल देत, धनगर ही ‘जात’ ठरवली आहे,जमात नाही. दुसरीही याचिका क्र. रिट सी नं.१२४३६/२००७ यातही निर्णय देत , धनगर ही ‘जात’ ठरवली आहे.’जमात’ नाही.