मा.श्री.धनंजयजी मुंडे यांच्या समवेत उमरेड तालुक्यातील पाचगाव, व कुही तालुक्यातील विरखंडी या गावांमध्ये शेतात झालेल्या सोयाबीन व कपाशीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी.
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीन प्रतिनिधी मो 9096817953
उमरेड (नागपुर) आज दिनांक 02/10/2023 सोमवार रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.श्री.धनंजयजी मुंडे यांच्या समवेत उमरेड तालुक्यातील पाचगाव, व कुही तालुक्यातील विरखंडी या गावांमध्ये शेतात झालेल्या सोयाबीन व कपाशीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. माझ्या उमरेड मतदार संघातील शेतकऱ्यांचे व त्यांच्या पिकाचे झालेले नुकसान मंत्रीमहोदयांचा लक्षात आणून देत त्यांना लवकरात लवकर शासन मदत करावी अशी विनंती आमदार राजू भाऊ पारवे यांनी केली. सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी तसेच जा शेतकऱ्यांनी पीक विमे काढले नसतील त्यांना पन सरसकट नुकसान भरपाईची मदत करावी
तसेच भिवापूर, उमरेड व कुही तालुक्यात जुलै, आगस्ट व सप्टेंबर 2019 महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे उर्वरित पैसे देण्याकरीता मंत्रीमहोदयांना निवेदन सादर केले. आज महाराष्ट्रातील शेतकरी पिकांवर येणाऱ्या संकटामुळे त्रस्त आहे त्यांना शासनाद्वारे तात्काळ मदत देऊन आपण सहकार्य केले पाहिजे हे मत मंत्री महोदयांसमोर मांडले.