समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे, महात्मा गांधीजी जयंती उत्साहात साजरा

समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे, महात्मा गांधीजी जयंती उत्साहात साजरा

समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे, महात्मा गांधीजी जयंती उत्साहात साजरा

समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे, महात्मा गांधीजी जयंती उत्साहात साजरा

प्रकाश नाईक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
मो. 📱 9511655877

नंदुरबार : आज दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय, मोरणे, धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागामार्फत महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त गांधीजीच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रघुनाथ महाजन सर होते, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रा.डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी महात्मा गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, भारत देश एकात्म आणि अखंड ठेवणे, स्वच्छता पाळणे, ग्रामीण भाग आणि ग्रामोद्योग विकास इत्यादी विषयी च्या कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी उपस्थित शिक्षक , शिक्षकतेर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला अभिवादन केले.व राष्ट्रीय एकात्मता संदर्भात विविध घोषणा देण्यात आल्या होत्या.
त्यानंतर आज गांधीजी च्या जयंती निमित्त महाविद्यालयाच्या ग्राउंड वर आणि आश्रम शाळेच्या परिसरात श्रमदान करून गवत,झाडे झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली.
श्रमदान नंतर सर्व एन एस एस स्वयंसेवकांना अल्पोपहार देण्यात आला. आज 79 स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे आणि विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे यांनी केले. डॉ. प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ महाजन व इतर शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी मानले होते.