माहुर कृषी उत्पन बाजार समितीमध्ये अभद्र युतीचे दर्शन…

माहुर कृषी उत्पन बाजार समितीमध्ये अभद्र युतीचे दर्शन...

माहुर कृषी उत्पन बाजार समितीमध्ये अभद्र युतीचे दर्शन…

माहुर कृषी उत्पन बाजार समितीमध्ये अभद्र युतीचे दर्शन...

✍🏻गोपाल नाईक✍🏻
नांदेड जिल्हा प्रतिनिधी…
मो..7499854591…

नांदेड : माहूर तालुक्यात सद्या कृषी उत्पन बाजार समितीच्या निवडणुकीची रनधुमाळी सुरु झाली.कृषी उत्पन बाजार समिती कोणाच्या दाब्यात जाईल.कुणाचा वरचष्मा राहिल हे आता तरी सांगणे अवघड झाले आहे.विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…? अशी द्विधा मनस्थिती कार्याकर्त्यांची झाली आहे.कारण वरिष्ठ पातळीवरील नेते कशा पद्धीतीने गलिच्छ राजकारण करुण सत्तेसाठी हापापलेले आहेत संपूर्ण देशाने पाहिले आहे व अनुभवले आहे.धनलक्ष्मीच्या बळावर सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रत्येक पक्षामध्ये चढाओढ निर्माण झाली.राजकारणाच्या पटलावरील हा घानेरडा व लोकशाहीला बाधक असलेला खेळ आता दिल्ली ते थेट गल्ली पर्यंत येऊन पोहचला आहे.गावपातळीवर सुद्धा घोडेबाजाराला उत आलेला आहे.सत्तेच्या हव्यासापायी पक्ष,निष्ठा विचारधारा हे सगळं वेशी टांगून लोकशाहीची लक्तरं हल्लीचे नेते काढताना दिसत आहेत.या नेतेमंडळीच्या आचरणातून ते वारंवार दिसत आहे.कार्यकर्ते बिचारे आपल्या आदर्श नेत्यांच्या कोलांट उड्यामुळे हैराण झाला आहे.पिढ्याण पिढ्याचे हाडवैर विसरूण दिलजमाई करण्याची वेळ आणली आहे.कोण कोणत्या गटाचा आहे किंवा पक्षाचा आहे हे कार्याकर्त्याच्या समजण्या पलिकडचे झाले आहे.कार्यकर्ते पुरते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून आपल्या वरिष्ठांविषयीची नाराजी उघडपणे बोलत आहेत.परंतु कार्यकर्त्यांच्या भावनांचा नेत्यांनी पार चोळामोळा करुण टाकला आहे.त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
अशाच अभद्र युतीचे दर्शन माहुर कृषी उत्पन बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये झाले आहे.सेना व राष्ट्रवाादी तसेच काॅंग्रेस व बिजेपी असेच काहिसे अनाकलनिय राजकिय समिकरण जुळवल्याचे बोलल्य जात आहे.
अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांने कोणती विचारधारा स्विकारावी ? कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यावा ? व कोणासोबत जावे ?असे अनंत प्रश्न सामान्यास पडले आहेत.राजकारणात आता पक्ष निष्ठा असे काही उरलेच नाही.कार्यकर्त्यांची घुसमट स्पष्टपणे जाणवत आहे.महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृत्तीचा व परंपरेचा स्वार्थी व सत्तापिंपासूकडून र्‍हास होताना दिसत आहे.जनतेला ग्रहीत धरुण राजकीय पुढारी आपल्या हितासाठी वाटेल तसे गल्लीच्छ राजकारण करताना दिसत आहेत.परंतु जनता मात्र अशाप्रकारच्या राजकारणाला कंटाळलेली आहे. अशा राजकारणामुळे विकासाला खिळ बसली आहे.जनता आधीच महागाई ,बेरोजगारी या समस्येचा सामना करत असताना राजकारणी मात्र स्वार्थासाठी वाटेल ते करत राजकारणाच्या तव्यावर आपलीच पोळी भाजण्याच सामुदायीक कार्यक्रम करताना दिसत आहेत.