कोपर येथे अनोखा सापशिडी महोत्सव
खेळाच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग तालुक्यातील कोपर येथे अनोखा सापशिडी महोत्सव नुकताच संपन्न झाला. मोक्षपट या खेळाची सुरुवात संत ज्ञानेश्वर माउलींनी केली. जीवन जगताना अनेक चढउतार येतात, परंतु या सर्वांवर मात करून जीवन जगण्यासाठी आणि समाजमाध्यमांच्या दुनियेत कालबाह्य होत चाललेला व आपल्या संस्कृतीची जाणीव करून देणारा युवकांना एकत्र आणून हा खेळ खेळला जावा हा या सापशिडी महोत्सवाच्या आयोजन करण्यामागील उद्देश आहे. कलाविश्व इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या ओपन द बुक या उपक्रमाअंतर्गत या एकदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कोपर येथील समाजमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्पिता सिधनकर यांनी केले, तर सूत्रसंचालन कौतुक निळकर यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेच्या सर्व वाटचालीचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हृषीकेश नाईक, अध्यक्षस्थानी नंदकुमार पाटील, प्रभाकर पाटील, कबड्डीपटू रमाकांत पाटील, शरद म्हात्रे, प्रणित म्हात्रे, मधुकर धुमाळ, देवेंद्र केळुस्कर, निशांत रौतेला, जयप्रकाश ठाकूर, डाॅ. रेखा म्हात्रे, तुषार पाटील, अनिकेत ठाकूर, सुशील साईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध गावांमधील/शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे विविध वयोगटानुसार क्रमवारी करून हा खेळ खेळण्यात आला. दुपारी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि स्पर्धेत सहभागी विद्यार्थाना सहभाग प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. आभारप्रदर्शन रुपेश पाटील यांनी केले.
कोट
कालबाह्य होत चाललेला सापशिडी या खेळाला पुन्हा
एकदा युवकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या महोत्सवाच्या माध्यमातून हे पारंपरिक खेळ सातत्याने घेण्याचा आमचा मानस आहे.
प्रणित म्हात्रे
अध्यक्ष, कलाविश्व इंटरनॅशनल फाऊंडेशन