एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहे

105
एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहे

एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहे

एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहे

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953

नागपूर .राज्याच्या उपराजधानीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहे. विजय पचोरी असे या प्रकरणातील वडिलांचे नाव आहे. तर पत्नी बालाबाई पचोरी गणेश पचोरी, दीपक पचोरी असे इतर मृतकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र या घटनेने नागपूर जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
तर या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. तसेच प्रकरणातील वडिलांनीच तिघांच्या हत्येनंतर स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप तरी या प्रकरणामागील कारण स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत असून तपासाअंतीच या प्रकरणामागील कारण कळू शकणार आहे.

शिक्षकानेच आख्ख्या कुटुंबासह आयुष्य संपवलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील वडील विजय पचोरी हे सेवानिव्रुत्त शिक्षक आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या व्यवसायातील आर्थिक तंगीमुळे कुटुंबात आधीच वाद सुरु सुरू होता. त्यामुळे या वाद अधिक विकोपाला गेला असावा आणि त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र दुसरीकडे प्रकरणातील चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकल्या अवस्थेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकरणातील वडिलांनीच तिघांची हत्या केली असावी आणि हत्येनंतर स्वत: आत्महत्या तर केली नाही ना? अशीही शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. मात्र, घटनेची सत्यात पोलीस तपासतूनच पुढे येणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत