खोजा शिया कब्रस्तानचा लोकार्पण सोहळा मा. कार्यसम्राट आ. समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते संपन्न.

54

खोजा शिया कब्रस्तानचा लोकार्पण सोहळा मा. कार्यसम्राट आ. समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते संपन्न.


मुकेश चौधरी प्रतिनिधी
हिंगणघाट:- स्थानिक नगर परिषद प्रभाग क्रमांक २ संत चोखोबा वार्ड हिंगणघाट येथे महाराष्ट्र शासनाचा नगर परिषद करिता वैशिष्ट्यपूर्ण निधी सन २०१७-१८ अंतर्गत ₹२३.७५ लक्ष अनुदानातून बाग -ए -जहरा खोजा शिया जमात कब्रस्तान तथा गुसलखाना इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 31/10/2020 ला मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार , हिंगणघाट-समुद्रपूर-सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्र यांचे हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी मा.श्री.जमालभाई सिद्दीकी (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय अल्पसंख्याक मोर्चा), मा.श्री.प्रेमबाबु बसंतानी नगराध्यक्ष हिंगणघाट,मा.श्री.जुनेद खान पठाण महामंत्री भाजप अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश , सौ.शितलताई खंदार बांधकाम सभापती, सौ. सुनिता ताई मावळे नगरसेविका हिंगणघाट, मा.हाजी आरिफभाई अजानी समाजसेवक हिंगणघाट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. इब्राहिम बक्श यांनी, प्रास्ताविक हसन अली अजानी तर आभार प्रदर्शन बिस्मिल्ला खाँ यांनी केले.