हिंगणघाट जुगाऱ्यांना जुगार खेळतांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

मुकेश चौधरी प्रतिनिधी

हिंगणघाट:- शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली जुगाऱ्यांना जुगार खेळतांना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची घटना शहरात काल सायंकाळी घडली. यात ९ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, नगदी ३० हजार ११० रुपयासह जुगार खेळण्यात वापर करण्यात आलेले ५२ पत्ते असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

यात परसराम राजकुमार गंगवानी (३२), रा. सिंधी कालनी हिंगनघाट,  प्रकाश मारोतराव गाले (४८), रा.गांधीवार्ड, मनोज अशोक सावरकर (३३) गोमाजीवार्ड, कुणाल अशोक महेशकर (२६) रा.कबीरवार्ड, समीरसींग अत्तरसींग भादा (३९) रा.चोखोबावार्ड, सचिन अरून पराते (३२) रा. विठठलमंदीर वार्ड तरजेब हुसेन खान पठान(३६) रा.इंदीरा गांधी वार्ड तसेच अमोल दिलीप कांबळे (३०) रा. इंदीरा गांधीवार्ड, शूभम शामराव आंबेरे (२४) रा. इंदीरा गांधीवार्ड, हिंगणघाट तसेच
भैया मुकिंदा जोरांडे रा. आंबेडकर वार्ड, सिंदी(रेल्वे) इत्यादि नऊ आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here