दिवाळीचा फळाळ व चिवडा बनवताना गॅसने घेतला पेट; एका मुलाचा मृत्यू तर आजी गंभीर जखमी.

41

दिवाळीचा फळाळ व चिवडा बनवताना गॅसने घेतला पेट; एका मुलाचा मृत्यू तर आजी गंभीर जखमी.

दिवाळीचा फळाळ व चिवडा बनवताना गॅसने घेतला पेट; एका मुलाचा मृत्यू तर आजी गंभीर जखमी.
दिवाळीचा फळाळ व चिवडा बनवताना गॅसने घेतला पेट; एका मुलाचा मृत्यू तर आजी गंभीर जखमी.

युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 95275 26914

नागपूर :- नागपुर येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपुर येथील सदर पोलिस सटेशनच्या हद्दीत येणा-या सेमिनरी हिल्स परिसरातील बांधकाम विभागाच्या क्वॉर्टरमध्ये गॉस सिलिंडरला आग लागल्याने कुलदीप राजपूत वय 12 वर्ष हा गंभीररित्या जळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची आजी सुषमा कश्यप वय 60 वर्ष या गंभीर जखमी झाल्या. (दि. 1) सोमवारला दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, सर्वीकडे दिवाळीची धुमधाम सुरु आहे. रोज नवनवीन पदार्थ घरी बनवण्यात येतात त्याच निमित्त बांधकाम विभागाच्या क्वॉर्टर नंबर 18 मध्ये राहणारे रहिवासी कुलदीप याची आजी सुषमा कश्यप व मामी आराधना कश्यप शेगडी खाली ठेवून दिवाळीनिमित्त चिवडा तयार करत होते. त्यावेळी कुलदीप शेगडीजवळ बसला होता. काही वेळाने आराधना आपल्या मुलाला घेऊन बाधरूममध्ये गेली. त्यावेळी कुलदीपने सिलिंडरच्या रेग्युलेटरचा पाईप ओढण्याला सुरुवात केली. यामुळे रेग्युलेटरचा पाइप निघताच आगीने भडका घेतला. यात कुलदीप भाजला. त्याच्या आजीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात तिचे हात भाजले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचली. सदर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, उपनिरीक्षक गुरुनुले, मोटे व प्रमोद दिघोरे घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी पाठविले. डॉक्टरांनी तपासणी करून कुलदीपला मृत घोषित केले.

मृतक कुलदीपची आई रायपूर येथे राहते. मागील दोन वर्षांपासून कुलदीप आजी व मामाकडे राहत होता. तो सातव्या वर्गात शिकत होता. बुधवारी त्याची आई मुलाच्या भेटीसाठी येणार होती; परंतु, भेटीपूर्वीच मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.