युवा साहित्य संमेलन’ अकोला येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी, मो.नं.-9822724136
सावनेर-31ऑक्टोंबर 2021
17 ऑक्टोबर २०२१ रोजी ‘युवा साहित्य संमेलन’ अकोला येथे मंचावर उपस्थित प्रसिद्ध मान्यवर
मा.प्रा.पृथ्वीराजसिंह राजपूत (नाट्यअभिनेते),मा.डॉ.रावसाहेब काळे (बोलीभाषा अभ्यासक), मा.डॉ.निलेश पाटील (अध्यक्ष राष्ट्रीय युवा संघटना अकोला),मा.पुष्पराज गावंडे (युवा कादंबरीकार),मा.शिरीष धोत्रे (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला),मा.किरण सोनार,मा.प्रा.सदाशिव शेळके यांच्या उपस्थितीत पार पडले. तसेच याच मंचावर *मीता अशोकराव नानवटकर* व *चित्रा भारत पगारे* लिखित ‘ती अशीच आहे’ हा संयुक्त काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.या पुस्तकास श्री.धनंजय मुळे यांची प्रस्तावना व श्री.विष्णू संकपाळ यांची शुभेच्छा लाभलेली आहे.प्रसिद्ध चित्रकार श्री.अरविंद शेलार यांचे बोलके मुखपृष्ठ मानवी मनात कुतुहल निर्माण करण्यात यशस्वी ठरते.
सावनेर तालुक्यातील आजनी येथील रहिवासी मीता अशोकराव नानवटकर व चित्रा भारत पगारे( जळगाव) यांनी लिहिलेला संयुक्त काव्यसंग्रह स्त्री मनातील भावनांचा संतृप्त हुंकार *ती अशीच आहे* पुस्तक प्रकाशित झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.