सरदार वल्लभभाई पटेल आधुनिक भारताचे शिल्पकार-डॉ. मंगेश गुलवाडे
जयंती निमित्य नागरिकांना बंगाली कॅम्प येथे उज्वला योजने अंतर्गत गॅस वितरणाचा कार्यक्रम संपन्न

जयंती निमित्य नागरिकांना बंगाली कॅम्प येथे उज्वला योजने अंतर्गत गॅस वितरणाचा कार्यक्रम संपन्न
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016
चंद्रपूर : -भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरातील पूर्व (बंगाली)कॅम्प मंडळात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्य महानगर सचिव एड.सारिका संदूरकर यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना उज्वला गॅस योजनेअंतर्गत 28 लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्यात आले त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आधुनिक भारताचे शिल्पकार असून त्यांनी भारताची 562 संस्थान विलीनीकरण करून भारताची राष्ट्रीय एकता व अखंडता अबाधित ठेवली ही भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले सदर कार्यक्रमात महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले कार्यक्रमात महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,मनपा गटनेत्या जयश्री जुमडे,भाजपा बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ.दीपक भट्टाचार्य,भाजपा सचिव चंदन पाल,ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी,बंगाली कॅम्प ओबीसी मोर्चा अध्यक्ष सचिन संदूरकर,किसान मोर्चा अध्यक्ष राजू घरोटे,बळीराम शिंदे, आकाश मस्के,उमेश नक्षीने,ज्योती उगेमुगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती…….