मीडिया वार्ता वर्तमान पत्राच्या पत्रकार यांनी श्री प्रवीण पाटील साहेब यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा दिल्या.
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव – संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, माणगांव तालुका पत्रकार संघ तसेच मीडिया वार्ता न्यूज पत्रकार यांच्या वतीने माणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रवीण सुरेश पाटील हे सेवानिवृत्त झाल्या बद्द्ल त्यांचा रायगड माणगांव मीडिया वार्ता च्या माध्यमातून पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कर्तव्यदक्ष श्री प्रवीण पाटील हे उपअधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गेली दोन वर्षे निष्ठेने माणगांव करांची सेवा केली. साहेबांची ज्या ज्या ठिकाणे बदली झाली त्या त्या ठिकाणी निष्ठने सेवा केली. पाटील साहेबाचा जन्म पालघर येते झालं 35 वर्ष पोलीस खात्यात सेवा करीत आज रोजी त्याची माणगांव येते सेवा निवृत्त मिरवणूक काढण्यात आली यावेळी रायगड जिल्ह्यातील पोलीस खात्यातील कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे माणगांव तालुक्यातील सर्व पक्षातील कार्यकर्ते यांनी पाटील साहेबाना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदरक्षणाय खळनिग्रणाय आपल्या कुटूंबापासून दूर राहुन आपल्याला सुरक्षित जीवनाचा आनंद देणारे महाराष्ट्र पोलीस आहेत. एखादा चित्रपटात शोभेल असे जवळपास साडेतीन दशकाचे झजावती आयुष्य पोलीस खात्यात व्यतित करून जनतेची सेवा करून निवृत्त होणारे रुबाबदार डॅशिंग व्यक्तिमत्व पोलीस खात्यात अलीकडंच्या काळात केवळ दुर्मिळ अशक्य कर्त्याव्यदक्ष कर्त्याव्यतत्पर सेलिब्रेटीलाही लाजवेल असे चिरतरुण पोलीस अधिकारी आज शासन नियमानुसार वयाची अट म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. ज्यांना पाहताक्षणी पोलीस अधीक्षक पोलीस अधिकारी असावा तर कसा तर पोलीस अधिकारी असावा प्रवीण पाटील सरांसारखा.
१५ जून १९८७ साली एम पी ए एस सी पोलीस खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत झाले २८ वर्ष मुबंई आर्थिक गुन्हे शाखा क्राईम ब्रांच पोलीस स्टेशनं डिटेक्टिव्ह ब्रांच अशा अनेक विविध विभागात कामे केली यानंतर तीन वर्ष अमरवती विभागाची यशस्वी धुरा सांभाळली पालघर,भोईसर, खेड येथे आपल्या कामाने लोकांची मने जिंकली पोलीस उप अधीक्षक उप विभागीय अधिकारी प्रवीण पाटील हे माणगांव मध्ये १६ ऑक्टोबर २०२० रोजी रुजू झाले प्रवीण पाटील साहेब हे देखणा नायक कळावंत दंडलेला आहे. या पैकी मराठी हिंदी चित्रपट मध्ये अभिनयचे काम केले आहे.अब तक छप्पण नाना पाटेकर याच्या सोबत काम केले आहे. अभिनयचे अंग असलेला हा नायक प्रत्यक्ष जीवनात ही खरा हिरो ठरला आहे.सराची ओळख एन्काऊटर स्पेशालिस्ट म्हणूनही जगाताचा थरकाप उडविणारी माणगांव मध्ये आल्या आल्या वरिष्ठाच्या आदेशानुसार अर्णव गोस्वामीला लिलाया उचलणारे अधिकारी आपले प्रवीण पाटील सर् सर्वस्व चॅनल च्या बातम्या मधून आपल्याला पाहायला मिळाले आपण केलेली सेवा आणि त्याचे संचित पुण्याचं आपल्याला हे दिवस दाखवले सर तुम्ही भाग्यवंत आहात खरे हिरो आहात.