मासेमारीला गेला ,जीव गमावला केरोडा येथील घटना

45

मासेमारीला गेला ,जीव गमावला

केरोडा येथील घटना

मासेमारीला गेला ,जीव गमावला केरोडा येथील घटना

बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधि
7263907273

सावली : – सावली तालुक्यातील केरोडा येथील गाव तलावात
मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला . ही घटना मंगळवारी ( ता . १ ) दुपारच्या सुमारास घडली . सुखदेव बापू राऊत ( वय ६० ) असे मृताचे नाव आहे . सावली तालुक्यातील केरोडाच्या सरपंच सोनी रवींद्र राऊत यांचे ते सासरे होते

केरोडा येथील सुखदेव राऊत हे मासेमारी सोबतच शेती सुद्धा करायचा मागील तीस वर्षांपासून तो मासेमारीचा व्यवसाय करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे मात्र दिनांक १ मंगळवार ला सोसायटीच्या वतीने केरोडा गावातिलच तलावात मासेमारी
. मार्केट ठेवण्यात आले होते . त्यामुळे परिसरातील गावातील मत्स्य व्यवसाय करणारे मासेमारीकरिता एकत्रित जमले होते . यामध्ये केरोडा येथील अन्य मासेमारांसोबत सुखदेव राऊत हेदेखील गेले होते . राऊत हे मासेमारीकरिता जाळे घेऊन गाव तलावात पाण्यात शिरले . परंतु , अचानक तलावात बुडून त्यांचा मृत्यू झाला सोबत्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अपयश आले . सदर घटनेची माहिती सावली पोलिस ठाण्याला देण्यात आली . त्यानंतर घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले . पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय सावली येथे पाठविला . पुढील तपास ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे