भांडणा नंतर बायको आणि मुलाला आणायला सासरवडीला गेला अण सासुलाच घेऊन गेला
कल्याण. (क्राईम न्यूज ) बायकोसह मुलाला आणायला गेला , बायको मिळाली नाही म्हणून केले भलतेच कृत्य ..
हिरामण गोरेगावकर
कल्याण : पतीसोबत भांडण झाल्यानंतर माहेरी गेलेल्या बायकोला मुलासह पती आणायला गेला. मात्र बायको भेटली नाही, म्हणून तरुणाने सासूचेच अपहरण करत तळोजा परिसरात डांबून ठेवले. इतकेच नव्हे तर रागाच्या भरात सासूला लोखंडी रॉड व कैचीने मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आला आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जावई भावेश मढवी व त्याचा मित्र सूरज म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
नवी मुंबई तळोजा परिसरात भावेश मढवी हा त्याची पत्नी दिक्षिता व मुलासोबत राहतो. गेल्या काही महिन्यांपासून भावेश व दक्षतामध्ये वाद होत होते. रोजच्या भांडणाला कंटाळून दिक्षिता मुलाला घेऊन कल्याण पूर्वेकडील मलंग रोड अमरदीप कॉलनी येथे माहेरी आली होती.
संतापलेल्या भावेशने त्याचा मित्र सूरज म्हात्रे याला घेत अमरदीप कॉलनी गाठली. घरात आल्यानंतर सासू दीपाली खोकरे हिला माझी बायको कुठे आहे. माझ्या मुलाला कुठे विकले असे विचारत सासूशी वाद घालण्यास सुरुवात केली. दीपाली यांना चाकूचा धाक दाखवत भावेश व सूरज यांनी पोलिस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने जबदरदस्तीने गाडीत बसवत नवी मुंबई तळोजा येथील आपल्या घरात डांबून ठेवले.
भावेश व सुरज या दोघांनी दिपाली यांना लोखंडी रोड व कैचीने मारहाण केली. या दरम्यान भावेशने पत्नीला फोन करून मुलाला आणून दे, तुझी आई माझ्या ताब्यात असल्याचे सांगितले.
दीक्षिताने मानपाडा पोलीस ठाण्यात भावेश मडवी व सूरज मात्रे या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली . या तक्रारी नुसार पोलिसांनी जावई भावेश मढवी आणि सूरज म्हात्रे या दोघानाही अटक करत पुढील तपास सुरू केला आहे .या घटनेचा उलघडा झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.