श्री साई पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची फिलिप्स इंजिनीरिंग सर्व्हिसेस मध्ये निवड • कॅम्पस मुलाखतीद्वारे करण्यात आली निवड

42
श्री साई पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची फिलिप्स इंजिनीरिंग सर्व्हिसेस मध्ये निवड • कॅम्पस मुलाखतीद्वारे करण्यात आली निवड

श्री साई पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची फिलिप्स इंजिनीरिंग सर्व्हिसेस मध्ये निवड

• कॅम्पस मुलाखतीद्वारे करण्यात आली निवड

श्री साई पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची फिलिप्स इंजिनीरिंग सर्व्हिसेस मध्ये निवड • कॅम्पस मुलाखतीद्वारे करण्यात आली निवड

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 2 नोव्हेंबर
स्व. मुरलीधरराव येरगुडे स्मृती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर लगेच रोजगार मिळावा या दृष्टीकोनातुन संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक व्हि. येरगुडे व सचिव अमित व्हि. येरगुडे यांच्या मार्गदर्शनात व सातत्याच्या पुढाकाराने संस्थेत दरवर्षी विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्याचे कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात येत असते.१ नोव्हेंबर, बुधवार रोजी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाद्वारा फिलिप्स इंजिनीरिंग सर्व्हिसेस करीता कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.

फिलिप्स इंजिनीरिंग सर्व्हिसेस एन.टी.पि.सी., जि.एम.आर., अदानी पॉवर, ऑपरेशन मेंटेनन्स, कोल हँडलिंग प्लांट या विविध कंपनीकरीता आपल्या इंजिनीरिंग सर्व्हिसेस पुरविण्यात देशात अग्रेसर आहे. या कंपनीसाठी घेण्यात आलेल्या या कॅम्पस मुलाखतीला जनरल मॅनेजर, मोहमद रहीम, सेप्टी. मॅनेजर, सुशिल गंगारे, संस्थेचे सचिव मा. अमित व्हि. येरगुडे, कॉलेजचे प्राचार्य एस. एन. पिलारे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. ए. आर. बहाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कॉलेजमधील कॅम्पस प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून संस्थेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज देशात व विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये पदारूढ आहेत. फिलीप्स इंजिनीरिंग सर्व्हिसेस साठी कॉलेजमधे घेण्यात आलेल्या या कॅम्पस मुलाखतीमध्ये श्री साई पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व इलेट्रॉनिक्स इंजि. अंतिम वर्षाच्या १७ विद्यार्थ्यांची या कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झालेली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए. आर. बहाले यांनी तर आभार प्रा. अमित ठाकरे यांनी केले. कॅम्पस मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख प्रा. एन. डब्ल्यू. पठाण, प्रा. एस. एम. ढेंगळे, प्रा. जे.बि. भोयर, प्रा. एम. ए. तांबोली, प्रा.जि.एस. पाकमोडे, प्रा. एस. एस. सरकाटे, तसेच प्रा.पि.जि. धोटे, प्रा. एम. एस. पाठक, सचिन ढेंगळे, संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.