कामगारांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्या – कामगार नेते राजेश बेले • जि. आर. कृष्णा फेरो अँड अलॉय कंपनी कामगारांच्या उपोषण मंडपाला भेट देत केली मागणी

54
कामगारांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्या - कामगार नेते राजेश बेले • जि. आर. कृष्णा फेरो अँड अलॉय कंपनी कामगारांच्या उपोषण मंडपाला भेट देत केली मागणी

कामगारांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्या – कामगार नेते राजेश बेले

• जि. आर. कृष्णा फेरो अँड अलॉय कंपनी कामगारांच्या उपोषण मंडपाला भेट देत केली मागणी

कामगारांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्या - कामगार नेते राजेश बेले • जि. आर. कृष्णा फेरो अँड अलॉय कंपनी कामगारांच्या उपोषण मंडपाला भेट देत केली मागणी

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर : 2 नोव्हेंबर
जिल्ह्यातील मरेगाव येथील जि. आर. कृष्णा फेरो अँड अलॉय कंपनीतील कामगारांनी गुरुवार, 2 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी कंपनीसमोर आपल्या १० प्रमुख मागण्यांची यादी ठेवून कंपनी व्यवस्थापनाला निवेदन दिले. दरम्यान, कामगार नेते राजेश बेले यांनी आज उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी कंपनीचे मालक अग्रवाल यांच्याशी चर्चा करून कामगारांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे.
आंदोलनकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला एक आठवडा मुदत दिली आहे. जर कंपनी व्यवस्थापनने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर, कामगारांनी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.
आंदोलनात सहभागी असलेल्या कामगारांनी सांगितले की, कंपनी व्यवस्थापन गेल्या काही महिन्यांपासून कामगारांच्या हक्कांवर आघात करत आहे. वेतनवाढ, वेतन स्लिप मिळणे, बोनस कापण्यात येऊ नये, वैद्यकीय सुविधा, अतिरिक्त चार तासाचे वेतन देणे, स्थानिक कंत्राटधारकांना प्राधान्य देणे, कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेणे, ऑपरेटर आणि ड्रायव्हरला कंपनीत समाविष्ट करणे, बंदीच्या काळात कामगार आणि ऑपरेटरला काढून टाकण्यात येऊ नये आणि सुट्टीच्या दिवशी काम केल्यास दुप्पट वेतन देणे या सर्व मागण्या कंपनी व्यवस्थापनने मान्य करून कामगारांना न्याय दिला पाहिजे, अशी मागणी राजेश बेले यांनी केली आहे.